Tarun Bharat

महेश फौंडेशनमध्ये देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

केएलई स्कूल ऑफ म्युझिकतर्फे दि. 10 ऑगस्ट रोजी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार आझादी का अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने महेश फौंडेशनमध्ये देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला.

केएलई संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हिंदी, कन्नड आणि मराठी भाषेमध्ये देशभक्तीपर गीते उत्साहात सादर केली. महेश फौंडेशनच्या चिमुकल्यांनी प्रत्येक गाण्याला उत्साहाने आणि आनंदाने टाळय़ा वाजवून वंदे मातरम्, भारत माता की जयच्या घोषणा देत प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाला महेश फौंडेशनचे संस्थापक महेश वसंत जाधव उपस्थित होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, आम्हाला आर्थिक साहाय्य करणारे बरेच लोक आहेत. पण केएलई संगीत विद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आम्हाला जो अमूल्य वेळ देऊन चिमुकल्यांचा आनंद द्विगुणीत केला, त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. याच पद्धतीने वर्षातून दोनवेळा गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्याचे आमंत्रण त्यांनी केएलई स्कूल ऑफ म्युझिकला दिले. आमच्याकडे संगीतासाठी वर्ग नाही. पण सहा महिन्यांत आम्ही मुलांना वर्ग उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी सांगितले.

यावेळी केएलई स्कूलतर्फे प्राचार्या डॉ. स्नेहा राजुरीकर यांनी महेश फौंडेशनमध्ये कार्यक्रम करण्याचे तसेच त्यांना लागेल ती संगितिक मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमामध्ये संवादिनीची साथ यादवेंद्र पुजारी, तबलासाथ जितेंद्र साबण्णावर आणि राहुल मंडोळकर यांनी दिली.

कार्यक्रमाला केएलई स्कूल ऑफ म्युझिकच्या प्राचार्या डॉ. स्नेहा राजुरीकर, प्राध्यापिका डॉ. सुनीता पाटील, डॉ. दुर्गा नाडकर्णी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रतिभा कल्लीमठ यांनी केले.

Related Stories

रोनित मोरेने बेळगावचे नाव उंचावले

Amit Kulkarni

कोरोना बाधितांचा शनिवारचा आकडा 30 च्या वर

Rohan_P

मासिक बसपासच्या मागणीत वाढ

Patil_p

संभाव्य पूर परिस्थितीसाठी आपत्ती निवारण पथक सज्ज

Amit Kulkarni

‘पंच’ कोण?, आज फैसला

Patil_p

कृष्णा नदीत बुडालेल्या तिघांचे मृतदेह सापडले

Amit Kulkarni
error: Content is protected !!