Tarun Bharat

मो.ग.कुंटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त लोकमान्य रंगमंदिरात आज कार्यक्रम

प्रतिनिधी /बेळगाव

गुरूवर्य मो. ग. कुंटे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त यंदा दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता लोकमान्य रंगमंदिर, येथे राहूल सोलापूरकर यांचे ‘रामकृष्णरीती शिवाय निती, मोदीकृती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

रविवार दि. 11 डिसेंबर रोजी सांगली येथील गायिका गीता दातार-लिमये यांचा गीत-सुधा हा मराठी हिंदी भावभक्ती गीतांचा कार्यक्रम वरेकर नाट्या संघ येथे सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. त्यांचा परिचय पुढील प्रमाणे.

राहूल सोलापूरकर उत्कृष्ट अभिनेते आहेत. कॉलेजमध्ये सलग पाच वर्षे त्यांनी पुरुषोत्तम करंडक पटकाविला आहे. राज्य नाट्या स्पर्धेतही बक्षीस पटकाविले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात ‘बेस्ट कॅडेट’सह 9 सुवर्णपदके त्यांनी मिळविली. 106 मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. उत्कृष्ट निवेदक असून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. स्वामी विवेकानंद या विषयावर एका वर्षात 101 व्याख्याने त्यांनी दिली आहेत.

गीता दातार

संगीत विशारद असणाऱ्या गीता दातार यांनी गुरुवर्य चिंतू बुवा म्हैसकर यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. ‘उत्सव तेजाचा’ या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत कार्यक्रम त्या करतात. अनेक संगीत कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. 1200 हून अधिक सांगितीक कार्यक्रम त्यांनी केले आहेत.

Related Stories

जिल्हा पंचायतमध्ये साकारली हिरवाईची प्रतिकृती

Amit Kulkarni

संकेश्वर नगर परिषदेकडून 20 कोटीचा प्रस्ताव

Amit Kulkarni

लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर यांची प्रदेश काँग्रेस प्रवक्तेपदी नेमणूक

Patil_p

श्री पंत महाराजांचा उत्सव यंदा सांकेतिक स्वरुपात

Patil_p

भूमिगत कचराकुंडय़ासाठी 41 लाखाच्या निविदा

Amit Kulkarni

स्वच्छतेसाठी प्रत्येक वॉर्डात कमिटी

Amit Kulkarni