आमदार, चेअरमन प्रवीण आर्लेकर प्रतिपादन : सोमवारी घेतला हस्तकला महामंडळाचा ताबा
प्रतिनिधी /पणजी, पेडणे
हस्तकला महामंडळाचा उपयोग ग्रामीण भागातील हस्त कलाकारांना करून देणार आहे. जे लघुउद्योग कारागीर आहेत त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. हस्तकलेतून पर्यटनाला चालना देण्याचा आपला विचार आहे. प्रत्येक पर्यटकांकडे गोमंतकीय हस्तकला पोचविली जाईल, असे प्रतिपादन पेडणेचे आमदार तथा हस्तकला महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर यांनी केले.
सोमवार दि. 25 एप्रिल रोजी हस्तकला महामंडळाचा ताबा घेतल्यानंतर स्थानिक पत्रकारांकडे बोलताना आर्लेकर यांनी ही माहिती दिली.
यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष तुळशिदास गावस, वझरी माजी सरपंच संगीता गावकर, तोरसे सरपंच उत्तम वीर, माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर, उगवे – तांबोसे- मोप पंचायतीचे उपसरपंच सुबोध महाले, पंच सुदाम परब, माजी सरपंच गौरी जोसालकर, नवचेतना युवक संघाचा कृष्णा पालयेकर, भंडारी को.सोसायटीचे व्यवस्थापक सुशांत मांद्रेकर, नगराध्यक्ष उषा नागवेकर, उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर, नगरसेवक माधव सिनाई देसाई, सिद्धेश पेडणेकर, शिवराम तुकोजी, आश्विनी पालयेकर, विशाखा गडेकर, तृप्ती सावळ देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, प्रियांका तुळसकर, पल्लवी आर्लेकर, साहिल आर्लेकर, आदिती आर्लेकर, धारगळ सरपंच भूषण नाईक, माजी सरपंच वल्लभ वराडकर, नरेश कोरागावकर, अशोक रेडकर, जयेश पालयेकर, श्रीराम सावंत, सिद्धांत मोरुडकर, राजन म्हापसेकर, रुपेश मांदेकर, आभिजित शेटय़े उपस्थित होते. सर्वांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांचे अभिनंदन केले.
पेडणेकरांच्या ज्या समस्या, प्रश्न असतील ते सरकारच्या सहकार्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. हस्तकला महामंडळाच्या ज्या योजना असतील त्या कलाकारांपर्यंत पोचविल्या जातील. त्याच्या केलेचे दर्शन सर्व गोमंतकीयांना करून देण्याचा आपला विचार असून त्यासाठी सर्वांनी साथ द्यायला हवी. हस्तकला महामंडळाच्या योजनांपासून कोणीही कलाकार वंचित राहणार नाही याची दखल घेतली जाईल, असे आर्लेकर यांनी सांगितले.
तुम्हाला मंत्रीपदा ऐवजी महामंडळ दिले त्यावर तुम्ही खुश आहात का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आमदार आर्लेकर म्हणाले, की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्यावर जी जबाबदारी दिली आहे ती विश्वासाने पार पाडणार. आपण सरकारकडे मंत्रीपद मागितले नव्हते परंतु मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रचारादरम्यान पेडणेवासियांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले होते ते हस्तकला महामंडळाचे चेअरमनपद देवून पूर्ण केले आहे. त्या पदाचा जनतेसाठी वापर करून हस्त कलाकार, हस्तकला केंद्र आहेत त्यांना उभारी देणार आहे.
सध्या हस्तकला महामंडळ हे उर्जिता अवस्थेत नाही, असे काहीजण सांगतात त्यावर आपण अभ्यास करून महामंडळाला उर्जिता अवस्था प्राप्त करण्यासाठी आपला प्रयत्न असेल. त्यासाठी महामंडळात जे अधिकारी, कर्मचारी, कामगार आहेत त्यांच्याद्वारे महामंडळाचे कार्य गावागावात पोचविण्यात येईल, असे आर्लेकर यांनी सांगितले.
ज्या वेळी आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला मतदारसंघात घरोघरी जात होतो त्यावेळी महिला, स्वयंसहाय्य गट तसेच हस्त कलाकारांना सरकारच्या ज्या ज्या योजना असतील त्या योजना मिळवून देणार, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकारने आमच्या आमदाराला हस्तकला महामंडळाचे चेअरमनपद दिले आहे त्याचे आपण स्वागत करते. हस्तकला महामंडळाच्या ज्या योजना आहेत त्या मतदारसंघातील तळागाळातील कलाकारांपर्यंत पोचवण्याचा आम्ही आमदारामार्फत प्रयत्न करणार, असे वझरी माजी सरपंच संगीता गावकर यांनी सांगितले.
लघु उद्योगाना प्रोत्साहन :गावस
आमदार आर्लेकर यांना हस्तकला महामंडळाचे चेअरमनपद देण्यात आले आहे. या महामंडळाचा उपयोग पेडणे बरोबरच संपूर्ण गोमंतकीयांसाठी करून देण्याचा त्यांचा मनोदय आहे. शिवाय जे पेडणे तालुक्मयात लहान उद्योग आहेत, त्या लघुउद्योगाना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न राहतील, असे तुळशिदास गावस यांनी सांगितले.
हस्तकाला लघू उद्योग महामंडळाच्या व्यवस्थपकीय संचालक दर्शना नारुल यांनी चेअरमन प्रवीण आर्लेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तुळशिदास गावस , नरेश कोरगावकर , अशोक रेडकर , संगीता गावकर आदीनी चेअरमन प्रवीण आर्लेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.