प्रतिनिधी /बेळगाव
पोलीस अधिकारी शंकर मारिहाळ यांना पोलीस अधिक्षकपदी बढती मिळाली आहे. हुबळी येथील हेस्कॉम विभागाच्या व्हिजिलन्स एसपी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शंकर मारिहाळ हे मुळचे मोदगा (ता. बेळगाव) येथील राहणारे आहेत. यापूर्वी त्यांनी येथील मार्केट पोलीस व निपाणी पोलीस स्थानकात सेवा बजावली आहे. सध्या हावेरी उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक म्हणून ते काम करीत होते. आता बढतीवर त्यांची हुबळीला बदली करण्यात आली आहे. बेळगाव येथे कार्यरत असताना अनेक प्रकरणांचा छडा लावण्यात त्यांचा सहभाग होता.