राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता रविवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे. गावगाड्यात गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडिया सुद्धा प्रभावीपणे वापर प्रचारात करण्यात आला आहे. दुसरीकडे, पंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज असल्याने प्रचारामध्ये प्रत्येक गावात महिलांचा सुद्धा मोठा सहभाग दिसून आला. सावंतवाडी तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत आहेत . त्यातील ७ ग्रामपंचायती बिनविरोध आल्याने ४५ ग्रामपंचायतींचा निवडणूक होत आहे .
सावंतवाडी / प्रतिनिधी