इच्छुक नगरसेवकांना स्थायी समिती अध्यक्षपदाची लॉटरी लागण्याची शक्मयता
प्रतिनिधी / बेळगाव
महापौर-उपमहापौर निवडणूक झाली असून आता स्थायी समिती निवडणूक प्रकियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर-उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांना स्थायी समिती अध्यक्षपदाची लॉटरी लागण्याची शक्मयता आहे. स्थायी समिती निवडणूक महापौरांच्या अध्यक्षतेखाली होत असली तरी निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्त ही प्रक्रिया पूर्ण करतात. त्यामुळे स्थायी समितीसाठी प्रस्ताव तयार करून प्रादेशिक आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे.
तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापौर-उपमहापौर निवडणूक होऊन लोकनियुक्त सभागृहाची स्थापना झाली आहे. पण सभागृहाचे कामकाज करण्यासाठी स्थायी समिती स्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. स्थायी समिती निवडणूक घेण्यासाठी प्रादेशिक आयुक्त तारीख निश्चित करणार आहेत. याकरिता महापालिकेकडून प्रादेशिक आयुक्तांना स्थायी समितीच्या निवडणुकीचा प्रस्ताव पाठविण्याची तयारी कौन्सिल विभागाकडून करण्यात येत आहे.
प्रादेशिक आयुक्तांनी तारीख निश्चित केल्यानंतर चारही स्थायी समित्यांची निवडणूक होणार आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीत इच्छुक असलेल्या नगरसेवकांची निवड स्थायी समिती अध्यक्षपदी होण्याची शक्मयता आहे. महापालिकेत चार स्थायी समित्यांची स्थापना करण्यात येते. यामध्ये आरोग्य स्थायी समिती, अर्थ व महसूल आणि अपील स्थायी समिती, सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती आणि लेखा स्थायी समिती अशा चार स्थायी समित्यांचा समावेश आहे. प्रत्येक समितीमध्ये सात नगरसेवकांचा समावेश असून चार सदस्य सत्ताधारी गटातील आणि तीन सदस्य विरोधी गटातील असतात. सात सदस्यांमधून अध्यक्षांची निवड करण्यात येते. त्यामुळे पुढील आठवड्यात स्थायी समित्यांची निवड प्रक्रिया होण्याची शक्मयता आहे.
निवड लवकरच …
- चार स्थायी समित्यांची स्थापना होणार
- पुढील आठवड्यात निवड प्रक्रिया शक्य