हवाईसुंदरीने पायलट गर्लंप्रेंडसमोर प्रेम केले व्यक्त
आकाशात उडत असलेल्या विमानात एका जोडप्याचा प्रपोजल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला फ्लाइट अटेंडेंट स्वतःच्या पायलट गर्लंप्रेंडला गुडघ्यांवर बसून प्रपोज करत असल्याचे दिसून येते. युजर्स याला लव्ह इज इन द एअर म्हणत आहेत.
फ्लाइट अटेंडेंटचे नाव वेरोनिका रोजस असून तिने स्वतःची पायलट गर्लप्रेंड एलेजांद्रा मोनकायोला 30 हजार फुटांच्या उंचीवर प्रपोज केले आहे. दोघेही अलास्कार एअरलाइन्सच्या एका फ्लाइटमध्ये होते. ही फ्लाइट सॅन फ्रान्सिस्कोहून लॉज एंजिलिस येथे जात होती.
वेरोनिका आणि एलेजांद्राची भेट दोन वर्षांपूर्वीच या फ्लाइटमध्ये झाली होती. काही भेटीनंतर दोन्ही युवतींचे परस्परांवर पेम जडले आणि त्यांनी अत्यंत रंजक स्वरुपात परस्परांना प्रपोज केले आहे. वेरोनिका आणि एलेजांद्राने परस्परांना रिंग घातली आणि सोबत राहण्याचे वचन दिले.
अलास्का एअरलाइन्सनेच या जोडप्याचा हा प्रपोजल व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत वेरोनिका आणि एलेजांद्राला फ्लाइटमध्ये अनाउंसमेंटद्वारे परस्परांना प्रपोज करताना पाहिले जाऊ शकते. वेरोनिकाने अन्य सहकारी कर्मचाऱयांच्या उपस्थितीत गुडघ्यावर बसून एलेजांद्राला प्रपोज केले. यादरम्यान लोकांनी टाळय़ा वाजवून या जोडप्याचा उत्साह वाढविला आहे. एलेजांद्रा आणि वेरोनिका दोघीही एलजीबीटीक्यू समुदायाशी संबधित आहेत. याचमुळे त्यांनी प्रपोजलसाठी प्राइड मंथची निवड केली. प्राइड मंथ समलैंगिक, ट्रान्सजेंडर आणि क्वीर लोकांचा महिनाभर चालणारा एक महोत्सव आहे.