बेळगाव : लायन्स क्लब ऑफ बेळगाव व अखिल भारतीय जैन युथ फेडरेशन, महावीर लिम्ब सेंटर हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम अवयव बसविण्याच्या शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. नेहरूनगर येथील माहेश्वरी अंध शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात बेळगाव परिसरातील 73 लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव बसविण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातील अनेक दिव्यांगांना कृत्रिम अवयव न मिळाल्याने त्यांना काम करणे कठीण जाते. कृत्रिम अवयव महाग असल्याने ते सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे लायन्स क्लबने गरजू नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव बसविण्याच्या शिबिराचे आयोजन केले होते. यापूर्वी नागरिकांना आवाहन करून त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले होते. लाभार्थ्यांच्या अवयवांचे मोजमाप घेऊन रविवारी त्यांना हे अवयव प्रदान करण्यात आले. लायन्स क्लबचे अध्यक्ष रविंद्र काकती म्हणाले, दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी आमचा हा एक प्रयत्न आहे. कृत्रिम अवयव मिळाल्यास दिव्यांग कोणत्याच कामात मागे पडणार नाहीत. लायन्स क्लबने हा एक सामाजिक उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्या प्रांतपाल सुगल्ला यलामाली यांनी लायन्स क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले. महेंद्र सिंगी यांनी स्मृतिचिन्ह देऊन लायन्स क्लबच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात दहा लाभार्थ्यांना फिटिंगचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी श्रीधर उप्पीन, सतीश बाळेकुंद्री, जयश्री काकती, राजशेखर हिरेमठ, लोणंद सोमशेखर, जयश्री हलभावी, श्रीकांत हलभावी, अशोक कटवे, हेमंत कित्तूर यासह इतर उपस्थित होते.
Next Article जिल्ह्यातील 200 हून अधिक तलाव कोरडे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.