Tarun Bharat

कांता कांबळेपासून आम्हाला संरक्षण द्या

महेश शिवदास यांची पत्रकार परिषदेत मागणी ;  अन्यथा आमच्या डेड बॉड्याच सापडतील

प्रतिनिधी/ सातारा

मारहाण कऊन दहा लाखाची खंडणी मागणारे मोकाट व खुलेआम वावरत आहेत. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांनाच पोलीस आत टाकण्याची भाषा करत आहेत. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक मोरे यांचेही संशयितांच्यासोबत लागेबांधे आहेत. खंडणी मागणाऱ्यांना जर अटक केली नाही तर आमच्या कुटुंबातील सर्वच सदस्य आत्महत्या करतील.  आमच्या बॉड्या पोलिसांना मिळतील, असा इशारा महेश शिवदास यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 

महेश शिवदास म्हणाले, वाढे फाटा येथे आमच्या बंधूंच्या 1998 पासून करार आहे. तोरणे यांच्यासोबत 2005 साली करार झालेला होता. त्यांनी आमच्या बंधूच्या व्यसनाचा गैरफायदा घेत नवीन करार अस्तित्वात आणला. खेडच्या ग्रामससेवकास मॅनेज कऊन त्यांनी स्वत:च्या सहीने जागा नावावर करण्याची मागणी केली आहे. त्या अर्जासोबत नोटरी नाही ना कोणताही दस्त. तरीही फेरफार करण्यात आलेला आहे. आमचे जळालेले पत्र्याचे शेडही एका रात्रीत चोऊन नेले. तेथे ज्या महिला कांsितलाल कांबळे याने पाठवून दिल्या होत्या. त्या महिलांनी यापूर्वी असेच गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांनी स्वत:च अंगावरची कपडे काढून टाकत माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. माझ्या 80 वर्षाच्या वडिलांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. माझा मुलगा चित्रीकरण करत होता त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला. ही काय मोगलाई लागलेली आहे का?, माझ्याकडे सारे पुरावे असताना पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई मारहाण करणाऱ्यांच्यावर होत नाही. दरोड्याचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते परंतु दरोड्याचा गुन्हा दाखल न करता साध्या चोरीचा गुन्हा शहर पोलिसांनी दाखल केलेला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर आणि पोलीस उपनिरीक्षक मोरे यांचीच त्यांच्यासोबत मिलिभगत आहे. निंबाळकर यांनी तर आमची प्रॉपर्टी खाली कऊन घ्यायची सुपारीच घेतली आहे. गुन्हा दाखल असणाऱ्यांनाच ते गुह्यातून नाव वगळण्याचे आश्वासन देत असतील तर अन्याय होणाऱ्यांनी करायचे काय?, कोयता गँगचा थरार पोवई नाक्यावर पाहिला. माझे घर लांब नाही तेथून. अशा मंडळींकडून माझ्या कुटुंबियांना धोका असून लवकरात लवकर संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला सामुदायिक आत्महत्या करावी लागेल. आमच्या डेड बॉडयाच पोलिसांना सापडतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

तपास एलसीबीकडे द्यावा

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे फिर्यादीलाच चुकीची वागणूक देत आहेत. माझ्या वडिलांना फरशीवर बसवले. ज्या महिलांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी केली तर त्यांना कित्येक असे चुकीचे गुन्हे त्या महिलेने दाखल केल्याचे समजेल त्यांना. विनयभंग कशाला म्हणतात, स्वत:च स्वत:च्या अंगावरील कपडे काढून धिंगाणा करणे हा काय. यामुळे याचा तपास एलसीबीकडे द्यावा, अशी मागणी शिवदास यांनी केलेली आहे.

Related Stories

सातारा : गजानन मंगल कार्यालयातल्या प्रस्तावित कोरोना केअर सेंटरला स्थानिक नागरिकांचा विरोध

Archana Banage

भाजपजवळ बोलायला काही ठोस नसल्याने केवळ स्टंट सुरु; रोहित पवारांची भाजपवर टीका

Archana Banage

अक्कलकोट शहरात पोलीस ठाणे व नगरपरिषद कडून संयुक्त कारवाई

Archana Banage

Sangli; जत तालुक्यातील कुडणुरात दुसऱ्यांदा सापडला हॅंडग्रेनेड बॉम्ब

Abhijeet Khandekar

संभाजीराजेंची दुर्गराज रायगडला भेट

Archana Banage

घटस्फोट घोषणेनंतर २४ तासाताच आमिर खान आणि किरण राव आले एकत्र …कसं ते वाचा सविस्तर

Archana Banage