प्रतिनिधी /बेळगाव
संयुक्त कामगार कृती समितीतर्फे कामगार दिनानिमित्त केंद्र सरकार आणि राज्यसरकारच्या विरोधात निषेध फेरी काढण्यात आली. सकाळी धर्मवीर संभाजी चौकातून या निषेध फेरीला सुरुवात झाली. किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, खडेबाजार, रामदेव गल्ली मार्गे गिरीष कॉम्प्लेक्सजवळ सांगता झाली.
त्यानंतर भगतसिंग सभागृहात ज्ये÷ कामगार नेते ऍड. राम आपटे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी ऍड. नागेश सातेरी, सामाजिक कार्यकर्ते सी. एस. बीडनाळ, जी. व्ही. कुलकर्णी, यल्लुबाई शिग्गिहळ्ळी, मंदा नेवगी, आदींनी केंद आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. तसेच खासगीकरण, शेतकरी विरोधी धोरण, वाढत्या महागाईला आळा घालण्यात अपयश आल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध नेंदविला. यावेळी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.