Tarun Bharat

चक्रतीर्थ यांची पाठयपुस्तक समिती रद्द करा : निषेध मोर्चा निदर्शने

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव :

बेळगावातील चन्नम्मा चौकात प्रगतीपर संघटनांच्या वतीने बंडखोर साहित्यिक डॉ. वाय. बी. हेम्मडी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य सरकारने नेमलेली रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठयपुस्तक सुधारणा समिती रद्द करण्याची मागणी निदर्शकांनी केली. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.

यावेळी बोलताना बंडखोर साहित्यिक डॉ. वाय. बी. हेम्मडी म्हणाले, बरगुर रामचंद्रप्पा यांच्या नेतृत्वाखालील पाठयपुस्तक सुधारणा समितीने तयार केलेली अभ्यासक्रमाची पुस्तके परिपूर्ण आहेत. देशातील वैविध्य टिकवून ठेवणारी, मुलांमध्ये देशभक्ती, राज्यभक्ती, कर्नाटकाची संस्कृती यांची मूल्ये रुजविणारी ती पुस्तके आहेत. तो कोणीही बदललेली नव्हती. परंतु शिक्षणतज्ज्ञ नव्हेच तर शिक्षणाचा गंधही नसलेल्या रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकांगी, एकमुखी निर्णय घेत प्रमुख साहित्यिकांचे लेखन सोडून एकाच समुदायाच्या लेखकांची निवड केली आहे. यातून ते शिकणाऱ्या विध्यार्थ्यांच्या मनात सनातन संस्कृतीचे वीषबीज पेरण्यास निघाले आहेत अशी बोचरी हेम्मडी यांनी टीका केली.

यानंतर रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखालील पाठयपुस्तक सुधारणा समिती रद्द करून बरगुर रामचंद्रप्पा यांच्या नेतृत्वाखालील पाठयपुस्तक सुधारणा समितीलाच मुदतवाढ द्यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला देण्यात आले.

Related Stories

बेळगाव नावाबाबत महाराष्ट्र सरकारला पत्र

Amit Kulkarni

गजानन महाराजनगरात नाला स्वच्छता मोहीम सुरू

Amit Kulkarni

दहीहंडीसाठी मनसे आक्रमक; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

Rohan_P

डीके लायन्स, अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघ विजयी

Amit Kulkarni

खानापूर महामार्गावरील निम्म्याहून अधिक हायमास्ट बंद

Amit Kulkarni

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी ‘ते’ वृत्त चुकीचं ; पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!