Tarun Bharat

फडणवीसांच्या त्यागाचा भाजपला अभिमान

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील; हिंदूत्व हाच आमचा श्वास आणि ध्यास असल्याचे केले स्पष्ट

मुंबई, कोल्हापूर- प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱया शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षशिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी केले. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी प्रदेश भाजपातर्फे शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांतदादा पाटील यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे, माधव भांडारी, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, कृपाशंकरसिंह, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार बबनराव लोणीकर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुनील कांबळे व आमदार नारायण कुचे उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेच्या आमदारांनी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले. त्यानंतर भाजपाने पर्यायी सरकार देण्यासाठी पुढाकार घेतला. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आणि ध्यास आहे. त्यामुळे हिंदुत्वासाठी लढणारे शिवसैनिक तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. भाजपकडे 113 आमदार असूनही हिंदुत्वासाठी मुख्यमंत्रिपद सोडताना देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखविला व त्याग केला. त्यांच्या त्यागाचा भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमान आहे.

चंद्रकांतदादा म्हणाले, हिंदुत्वाच्या आधारावर स्थापन झालेल्या भाजपा – शिवसेना युतीला जनतेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत दिले. परंतु, शिवसेनेच्या नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी हिंदुत्वाला सोडून अल्पसंख्यांकांचा अनुनय करणाऱया पक्षांसोबत आघाडी केली. त्यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत हिंदुत्व संकटात आले आणि विकासकामे ठप्प झाली. अशा स्थितीत अंतर्गत कलहामुळे आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपाने पर्याय देण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार राज्याची विकासकामे गतीने पूर्ण करेल आणि सर्वसामान्य माणसाला अभिमान वाटेल असे काम करेल, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

संजय राऊतांचे विधान हास्यास्पद ;यूपीए अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून हुसेन दलवाईंची टीका

Archana Banage

महालसीकरण मोहिमेंतर्गत शहरात 6,200 नागरिक लसवंत

Patil_p

रस्ते करतानाच आता राहणार ‘वॉच’

Archana Banage

भाजपकडून नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांच्यावर मोठी कारवाई

datta jadhav

जानेवारी पेड इन फेब्रुवारी !; महापलिका कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू

Archana Banage

संजय पांडे दीड महिन्यात शिवसेनेत प्रवेश करणार

datta jadhav