पुणे : मला पेंग्विन म्हटल्याचा अभिमान आहे. मी जेव्हा पेंग्विन मुंबईत आणले. ते पाहण्यास प्राणी संग्रहालयात अधिकाधिक लोक आले होते, त्याला किती प्रसिद्धी मिळाली ते तुम्ही पाहिलं. आम्ही अशी अनेक काम केली आहेत. त्याबद्दल देखील बोलत रहा. कोसटल रोड सेना अस देखील बोलू शकता.अशा शब्दात शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.पेंग्विन सेना म्हणून सतत भाजप नेत्याकडून टीका केली जात आहे. त्या प्रश्नावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भूमिका मांडली.
नवरात्र सणांच्या निमित्ताने शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यातील सारसबागे समोरील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. रश्मी वहिनी यांनी काल टेंभी नाक्यावर जाऊन दर्शन घेतले आहे. तुम्ही किंवा उद्धव साहेब जाणार आहात का? त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, तिथे वर्षानुवर्ष दर्शनाला गेलेलो आहोत. त्या प्रमाणेच त्या तिथे दर्शनाला गेल्या असल्याचं त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : यंदा ईशान्य मान्सूनही देशात अधिक; तर दक्षिणेत सरासरीत
दसर्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत. तो कसा असणार आहे. त्यावर ते म्हणाले की, आमची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. उद्धव साहेब देखील बाहेर पडणार आहेत. मात्र त्याच दरम्यान अनेक लोक उद्धव साहेबांना येऊन भेटत आहे. पक्ष प्रवेश होत आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांचा उद्धव साहेबांवर विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं.
शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून दसरा मेळाव्याबाबत व्हिडिओ समोर आले आहेत. या दोन्ही व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ते म्हणाले की, अनेक लोक वेगवेगळे मेळावे घेऊ शकतात. मात्र परंपरेनुसार आमचा शिवतीर्थावर शिवसेनेचा मेळावा होणार असल्याच सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.