साईराज चषक फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित दहाव्या साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून अलफते मुंबई, ग्लोबल केरळा, पीटीएम कोल्हापूर संघानी आपल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर आयोजित साईराज चषक फुटबॉल स्पर्धेत सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात अलफते मुंबई संघाने युनायटेड एफसी केरळ संघाचा 2-0 असा पराभव केला. 19 व्या मिनिटाला खतिब मुहंमदने पहिला तर 43 व्या मिनिटाला अर्माश अन्सारीने दुसरा गोल नोंदवला.
दुसऱया सामन्यात ग्लोबल एफसी केरळ संघाने रिअल चिकमंगळूर संघाचा टायब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव केला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केली. केरळतर्फे हसबीरने तर चिक्कमंगळूरतर्फे अबिदने गोल केला.
तिसऱया सामन्यात यानीपोहा मंगळूर संघाने मराठा स्पोर्ट्स मुंबई संघाचा 5-0 असा पराभव केला. मंगळूरतर्फे बावू निशाद, रियाज, अभिनश, नोगोबा, अमिन यांनी प्रत्येकी 1 गोल केले. चौथ्या सामन्यात पीटीएम कोल्हापूर संघाने बुल्स एफसी बेळगावचा 2-0 असा पराभव केला. पीटीएम कोल्हापूरतर्फे ओंकार मोरे व रोहित देसाई यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
पाचव्या सामन्यात फलकनुमा हैदराबाद संघाने डायमंड एफसी मिरज संघाचा 2-0 असा पराभव केला. हैदराबादतर्फे युसूफने दोन गोल केले.
सहाव्या सामन्यात ग्लोबल केरळा संघाने यानीपोहा मंगळूर संघाचा टायबेकरमध्ये 2-1 असा पराभव केला. निर्धारीत वेळेत रिंजूने ग्लोबल केरळाचा. तर मंगळूरतर्फे अभिनिषने गोल केला. सातव्या सामन्यात पीटीएम कोल्हापूर संघाने फलकनुमा संघाचा 2-0 असा पराभव केला. 45 व्या मिनिटाला ऋषिकेश मेथीने पहिला गोल केला. 58 व्या मिनिटाला पीटीएमच्या रोहित देसाईच्या पासवर ऋषिकेश मेथीने दुसरा गोल नोंदवला.
शनिवारी उपांत्यपूर्व फेरीचे सामने
1) साईराज बेळगाव वि. अलफते मुंबई सकाळी 8 वा., 2) दर्शन युनायटेड बेळगाव वि. एसआरएस गोवा पोलीस सकाळी 9 वा., 3) बुफा इलाईट बेळगाव वि. ग्लोबल एफसी केरळा 12 वा., 4) ब्रदर्स एफसी बेळगाव वि. पीटीएम कोल्हापूर दुपारी 2 वा.