मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार.
वार्ताहर / किणये
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्या संदर्भात किनीय भागात जनजागृती करण्यात आली आहे सोमवारच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार या परिसरातील कार्यकर्त्यांनी केला आहे.
सोमवारी रात्री बहादरवाडी येथे जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य मल्लाप्पा पाटील हे होते.
सीमा प्रश्नाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी व सीमा वासियांची एकजूट दाखविण्यासाठी या मेळाव्याला बहुसंख्येने सर्वांनी हजर राहावे असे आवाहन भाऊसाहेब पाटील, आप्पासाहेब कीर्तने व अनिल पाटील यांनी यावेळी केले.
महा मेळाव्याचे आयोजन सोमवारच्या दिवशी करण्यात आले आहे. यामुळे बहुतांशी भागातील शेतकरी सुद्धा या दिवशी शेत शिवारातील कामे बंद ठेवतात. सर्वांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन मलापा पाटील यांनी यावेळी केले
शिवाजी पाटील, मुकुंद डुकरे, अशोक तोराळकर, परशराम पाटील, शंकर पाटील ,शिवाजी लक्ष्मण पाटील विनायक पाटील आदींसह किणये, बहाद्दरवाडी, करले भागातील कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.