म्हसवड : प्रतिनिधी
म्हसवड, धूळदेव व गारवाड या ठिकाणी मंजूर असलेला व सात तालुक्यातील लाखो बेरोजगार, सुशिक्षित, तरुणांच्या हाताला उद्योग मिळवून देणारा आणि दुष्काळी भागाचे चित्र पालटणारा बंगळुरू मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा महत्वकांक्षी प्रकल्प पिढ्यान पिढ्याचा दुष्काळ असलेल्या भागातुन बागायत व सधन असलेल्या कोरेगांव तालुक्यात नेण्याचा घाट घातल्याच्या निषेधार्थ येत्या २ ऑक्टोबर रोजी दहा हजार लोकांच्या उपस्थितीत म्हसवड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनाचे जनजागृती करण्यासाठी माण तालुक्यात पहिली बैठक धूळदेव येथे मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर२०२२ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. माण नंतर खटाव, आटपाडी, सांगोला, जत, माळशिरस, पंढरपूर या तालुक्यात हि या प्रकल्पासाठी गावो गावी जनजागृती बैठक घेण्यात येवून दोन आक्टोबरच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे बंगळुरू-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येणार असल्याचे कृष्णा खोरे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष मा महादेव कापसे यांनी सांगितले आहे.
सातारा जिल्ह्यातील स्व यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब देशमुख, पृथ्वीराज चव्हाण व महाराष्ट्र राज्याचे सातारा जिल्ह्यातील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार घेताच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्र शासनाचा म्हसवड धुळे व गारवाड येथे जुलै २०२२ रोजी बंगळुरू मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आठशे एकर जागेवर मंजूर आसलेल्या या प्रकल्पामुळे माणचेच नव्हे माण, खटाव, आटपाडी, सांगोला, जत, पंढरपूर व माळशिरस या सातारा सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्याचा दुष्काळ संपणार असे चित्र निर्माण झाले असताना सातारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना व सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील परिस्थिती माहिती असताना त्यांना कोणी तरी स्वार्थापोटी चुकीच्या पध्दतीने माहिती सांगून पिढ्यान पिढ्या पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा व तरुणांच्या रोजगाराचा दुष्काळ सहन करत आलेला माण तालुक्यातील हा महत्वकांक्षी औद्योगिकीकरण प्रकल्प कोरेगांव येथे स्थलांतरित करण्याच्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णया विरोधात लोकचळवळ उभा रहात आसुन दोन महिने माण, खटाव, माळशिरस, सांगोला, आटपाडी व जत तालुक्यातील नेते आज पर्यंत कागदोपत्री लढाई लढत होते आत्ता रस्त्यावरील लढाई येत्या २ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी दहा हजार लोकांच्या उपस्थितीत म्हसवड येथे आंदोलन करण्यात येणार आहे तरी या आंदोलनाच्या निमित्ताने जनजागृती निमित्त उद्या मंगळवार पासुन रस्त्यावरील लढाईचा नारळ धूळदेव येथून जन आंदोलनाच्या माध्यमातून कृष्णा खोरे पाणी संघर्ष समितीचे डॉ महादेव कापसे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात येणार आहे तरी दुष्काळी तालुक्यातील तमाम जनतेने नेते मंडळीनी या अस्थीत्वाच्या धूळदेव येथील लढाईच्या बैठकीला सर्वानी सकाळी ९ वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ महादेव कापसे यांनी केले आहे.