Tarun Bharat

व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती रॅली ; समाज प्रबोधन हेच ध्येय

प्रतिनिधी / बेळगाव : बेळगावात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी आज टिळकवाडी परिसरात तंबाखू आणि इतर व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती रॅली काढली. इंटरॅक्ट क्लब आणि टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या अपराध नियंत्रण मासानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले.

टिळकवाडीतील जी. जी. चिटणीस इंग्लिश माध्यम शाळा, ठळकवाडी हायस्कूल आणि बालिका आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज टिळकवाडी परिसरात व्यसनमुक्ती जनजागृती फेरी काढली. ढोल – ताशासह विविध मार्गावर लक्षवेधी संचलन करून विद्यार्थ्यांमार्फत व्यसनांचे दुष्परिणाबाबत जागृती केली.

जी. जी. चिटणीस इंग्लिश माध्यम शाळेच्या प्राचार्या नवीना शेट्टीगार यांनी रॅलीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यसनांचे दुष्परिणाम सांगण्याच्या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी रॅलीत उत्साहाने भाग घेतला असून व्यसनांविषयी जागृती केली आहे. त्यामुळे रॅलीचा उद्देश सफल झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यसनांचे शरीरावर तसेच कुटुंबावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. विधार्थी दशेषतच चांगल्या सवयी लावून घ्या, अभ्यासावरच लक्ष केंद्रित करा, लायसन्स नसताना वाहने चालवू नका, वाईट संगत व सवयींपासून दूर रहा, शाळेबाहेरचे कोणी तुम्हाला त्रास दिल्यास शिक्षकांशी किंवा पोलिसांशी सम्पर्क साधा. असे आवाहन पीएसआय मंजुनाथ पुजारी यांनी यावेळी केले.

Related Stories

गाळय़ांची सुनावणी 28 पर्यंत लांबणीवर

Amit Kulkarni

निलजीत गुरुवारी भव्य कुस्ती मैदान

Amit Kulkarni

निपाणीत पत्रकार अशोक याळगी यांना श्रद्धांजली

Patil_p

कारवारमध्ये रेल्वे प्रवाशाकडून 2 कोटीची रोकड जप्त

Omkar B

खूनप्रकरणी अल्पवयीनासह दोघांना अटक

Amit Kulkarni

सेंट झेवियर्स एनसीसी विंगतर्पे एनसीसी दिन साजरा

Amit Kulkarni