Tarun Bharat

वेंगुर्ले पोलीसांतर्फे ग्रामीण भागात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती

Public awareness under road safety campaign in rural areas by Vengurle police

वेंगुर्ले पोलीस स्टेशनतर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मठ-कुडाळ तिठा ते मठ भागात वहातुक नियमांचे पालन करण्यांबाबत जनजागृतीपर मोटर सायकल रँलीचा उपक्रम राबविण्यात आला. असे उपक्रम वेंगुर्ले पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या हद्दीतील गावात राबविण्यात येत आहेत.


वेंगुर्ले पोलीस स्टेशन अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील गर्दीची व वाहनांची मोठय़ा प्रमाणांत वर्दळ असलेल्या भागांत पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस मनोज परुळेकर व पोलीस कर्मचारी रिक्षा व्यावसायिक, दुचाकी वाहनधारक यांना तसेच सर्वसामान्य नागरीकांना वाहतुक नियमांचे पालन करणे, रिक्षा भाडे नियमानुसार घेणे, वाहने योग्य रित्या त्या जागेवर, कोणासही अडथळा येणार नाही अश्या ठिकाणी पार्क करणे, ट्रिपल शिट न घेणे, हेल्मेटचा कायम वापर करणे, फॅन्सी नंबर प्लेट तसेच कर्कश व मोठय़ाने वाजणारे सायलेन्सरचा वापर न करणे. याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले. याबाबत वहातुक

पोलीस मनोज परूळेकर यांनी या जनजागृती रँलीचा समारोप प्रसंगी मठ-कुडाळ तिठा मार्गदर्शन करीत नियम पाळण्याचे आवाहन केले.
वेगुर्ले पोलीसांतर्फे सदर कार्यक्रम हा पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस काँन्स्टेबल मनोज परुळेकर व पोलीस कर्मचारी यांनी मठ-कुडाळ तिठा येथे जनजागृती कार्यक्रम पार पाडले.

वेंगुर्ले(वार्ताहर)-

Related Stories

करुळ घाटमार्ग 26 जुलैपर्यंत बंद

NIKHIL_N

मालवण तालुका गाबित समाजतर्फे ‘आम्ही गाबित’ अभियान राबविणार

Anuja Kudatarkar

युवा शेतकऱयांवर ‘बाहुबली’ची क्रेझ

NIKHIL_N

कातळखोद शिल्प प्रत्यक्ष भेटीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार

Patil_p

21 जून पासून सर्व बाजारपेठ खुली

Anuja Kudatarkar

सहाय्यक निबंधक कार्यालयाचा शिपाई ‘लाचलुचपत’च्या सापळय़ात

Patil_p