Tarun Bharat

महागाईविरोधात काँग्रेसकडून 28 ऑगस्टला ‘जाहीरसभा’

Advertisements

28 ऑगस्ट रोजी ‘हल्ला बोल’ रॅली

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर सरकारला घेरण्याच्या उद्देशाने काँग्रेस 28 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात ‘हल्ला बोल’ सभेचे आयोजन करणार आहे. या सभेपूर्वी 17-23 ऑगस्टदरम्यान देशातील सर्व विधानसभा मतदारसंघांमधील बाजारपेठा आणि अन्य ठिकाणी ‘महागाई चौपाल’ आयोजित करण्यात येणार असल्याचे काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी सांगितले आहे.

काँग्रेसने 5 ऑगस्ट रोजी मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात आंदोलन केले होते, या आंदोलनात मोठय़ा संख्येत लोक जोडले गेले. पंतप्रधान मोदींनी हताशेपोटी या आंदोलनाला ‘काळी जादू’ ठरविण्याचा प्रयत्न केला. यातून भाजप सरकार गगनाला भिडणारी महागाई आणि बेरोजगारीवर अंकुश लावण्यास अपयशी ठरल्याचे दिसून येते असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

महागाई तसेच बेरोजगारी विरोधातील लढाई काँग्रेस आगामी काळात अधिक तीव्र करणार आहे. महागाई चौपालचा समारोप 28 ऑगस्ट रोजी रामलीला मैदानातील सभेसह होणार आहे. या सभेला काँग्रेसचे वरिष्ठ नेत संबोधित करणार  असल्याचे रमेश यांनी सांगितले आहे.

रामलीला मैदानातील सभेला पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी संबोधित करणार असल्याचे समजते. या सभेच्या व्यतिरिक्त राज्य काँग्रेस समित्यांकडून राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर महागाईविरोधात अनेक सभांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती रमेश यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाचा फटका भारतीयांना बसत आहे. दही, ताक, पॅक करण्यात आलेल्या वस्तूंवर अत्याधिक करांमुळे महागाई वाढतेय. तर सार्वजनिक संपत्ती स्वतःच्या भांडवलदार मित्रांना हस्तांतरित करण्यात आल्याने आणि सैन्यातील भरतीसाठी दिशाहीन अग्निपथ योजना सादर करण्यासारख्या पावलांमुळे रोजगाराची स्थिती बिकट होत असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.

Related Stories

पाक दहशतवाद्याला काश्मीरात कंठस्नान

Patil_p

भारत अमेरिकेकडून खरेदी करणार 30 ‘MQ-9B’ गार्डियन ड्रोन

datta jadhav

2021 च्या अखेरीस इस्रोकडून मानवरहित गगनयानचे प्रक्षेपण

Patil_p

काँग्रेसकडून निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचं आकलन करण्यासाठी ५ नेत्यांची नियुक्ती

Abhijeet Shinde

पेट्रोल, डिझेल दरात पुन्हा वाढ

Amit Kulkarni

देशातील सर्वात लांब एक्स्प्रेसवेचे उद्घाटन

Patil_p
error: Content is protected !!