Tarun Bharat

पर्यटकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

Advertisements

प्रतिनिधी /पणजी

गोव्यात येणारा देशी विदेशी पर्यटक हा केवळ किनारी भागापर्यंतच अडकून राहातो. राज्यात केवळ किनारी भागच पर्यटकस्थळे नसून गोव्याच्या कानाकोपऱया अनेक निसर्गरम्य स्थळे तसेच मंदीरे आहेत. या सर्व गोष्टींकडे पर्यटक पोचावेत या उद्देशाने राज्यात येणाऱया पर्यटकांसाठी शनिवारी आणि रविवार असे दोन दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी शुल्क आकारला जाईल. भविष्यात अंतराळ आणि पावसाळी पर्यटन हंगाम करण्याचा हेतू असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोव्यात येणारे पर्यटक ग्रामीण भागापर्यंत पोचले तर पर्यटन व्यवसायाला आणखीन चालना मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 पर्यटनाशी संबंधीत सर्व सेवा आता ऑनलाईन झाल्या असून त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. पर्वरी येथील सचिवलयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात त्यांच्या सोबत पर्यटनमंत्री रोहन खवटे, मुख्य सचिव पुनित कुमार गोयल, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन गणेश गावकर, पर्यटन खात्याचे सचिव श्री रवी तसेच अन्य मान्यवर व्यसपीठावर उपस्थित होते. राज्यातील पर्यटनाशी संबंधीत सर्व व्यवसायिकांना ऑनलाईन सेवेत समावून घेतले जाणार आहे. त्यामुळे सर्व व्यवसायिकांची नोंद सरकारकडे राहिल.

गोवा पर्यटन खाते व गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्यने आता राज्यातील सर्व पर्यटन सेवांची नोंदणी ऑनलाईन करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्राशी संबधीत सर्व भागदारकांना यात सामावून घेतले जाईल यात जलक्रीडा व्यवसायिक पर्यटक गाईड असो किंवा पर्यटनाशी संबंधीत अन्य व्यवसायिक असो. या ऑनलाईन सेवेमुळे बेकायदेशीर पर्यटन व्यवसायाना चाप बसणार आहे कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर पर्यटन व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही त्यावर पर्यटन खाते व पोलिसांचे लक्ष असेल असे त्यांनी सांगिले.

पर्यटन संबंधीत विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱया सर्वानी ऑनलाईन येणे जरूरीचे आहे. ऑनलाईन आल्यने या व्यवसायिकांचे ग्राहकाची घरबसल्या नोंदणी होईल तसेच व्यबसाईटद्वारे त्यांच्या व्यवसायाची जाहिरातही होईल. ऑनलाईन मुळे पर्यटना बाबत सर्व व्यावसाय कायदेशीर होणार आहे. राज्यात आता कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर पर्यटन व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही पर्यटन खात्याचे अशा बेकायदेशीर व्यवसायावर लक्ष असेल असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

 राज्यात आंतराष्ट्रीय पर्यटक मोठय़ा संखेने यावेत या उद्देशाने आंतराष्ट्रीय शिखर जी20 कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नुत्याच झालेल्या भेटीत आपण जी20 शिखर एखाद्यातरी कार्यक्रमाचे गोव्यात आयोजन करावे अशी त्यांनी विनंती केली असता त्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे 2023 सालात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय जी20 शिखर कार्यक्रम गोव्यात आयाजित केला जाणार आहे. या कार्यक्रमामुळे आंतराष्ट्रीय पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पर्यटनमंत्री रोहन खवटे म्हणाले की बेकायदेशीर जल क्रीडा व्यवसाय चालत असल्यास त्याची दखल घेतली जाईल. जलक्रीडांसाठी बंदर कपत्न खाते व पर्यटन खाते अशा दोन्ही खात्यांना नाहरकत दाखला आवश्यक असल्याचे खवटे यांनी सांगितले. ऑनलाईन सेवेमुळे राज्यात आता बेकायदेशीर व्यवसाय चालणार नाही असेही खवटे म्हणाले.

Related Stories

सोमवारी भारत बंदचे आयोजन

Amit Kulkarni

उसगांवात मोन्सूनपूर्व कामाला सुरुवात

Omkar B

मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात खंडणी वसूल केली जाते

Amit Kulkarni

घोषणाबाजी करून सरकारचा केला निषेध उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर

Omkar B

पणजीत उद्यापासून पुरुमेताचे फेस्त

Omkar B

संदीप खांडेपारकरांचे भाजपाला आव्हान

Amit Kulkarni
error: Content is protected !!