बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त आरती संग्रहाचे प्रकाशन आणि मोफत वितरण सोहळा गुरुवार दि. 25 रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 6.30 वा. घंगापुरीमठ, कोरे गल्ली येथे हा कार्यक्रम होणार आहे.
मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, नगरसेवक रवी साळुंके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.