Tarun Bharat

सकारात्मक दिशा दाखवणारे ‘लिव्हिंग द ग्रेटर लाईफ’चे विधानभवनात प्रकाशन

यशराज देसाईंच्या पुस्तकाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन

प्रतिनिधी/ मुंबई

महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराजदादा देसाई यांनी लिहिलेल्या ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी, 17 रोजी विधानभवनातील समिती कक्षात संपन्न झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’चे प्रकाशन करण्यात आले. आजच्या डिजिटल युगातील मानवी जीवनातील आव्हांनाकडे तत्त्वज्ञानात्मक प्रश्न म्हणून पाहात सकारात्मक दिशा दाखवणाऱया या पुस्तकाबद्दल यशराजदादा देसाई यांचे सर्व मान्यवरांनी यावेळी अभिनंदन केले.

  स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून यशराजदादा देसाई यशस्वीपणे काम करत आहेत. त्यांच्यातील अभ्यासू व विचारशील नेतृत्वाची ओळख पाटण तालुक्यास झाली आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी लिहिलेले ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ हे पुस्तक माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जीवनाकडे पाहण्याच्या त्यांच्या अनोख्या सम्यक दृष्टीचा परिचय करून देणारे आहे. शुक्रवारी विधानभवनातील समिती कक्षात या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  यशराजदादा देसाई यांनी हे पुस्तक लिहिण्यामागील आपली भूमिका मांडली. मोबाइल, त्यावरील समाजमाध्यमे, त्यावरून लिखित तसेच ऑडिओ-व्हिडीओ स्वरूपात होणारा माहितीचा प्रचंड मारा यांनी एक आभासी जग तयार झाले आहे. आता प्रत्येक व्यक्ती हे आभासी जग आणि वास्तव जग असे दुहेरी जीवन जगताना दिसते. यात माणसाच्या खऱया भावभावना, त्याचे श्रेयस, त्याच्या इच्छा-आकांक्षा, मानवी नाती या साऱयांपुढे डिजिटल आव्हान उभे राहिले आहे. या आव्हानाला सामोरे जाताना, आभासी आणि वास्तव जगातला तोल, बॅलन्स कसा सांभाळायचा, याचे तात्त्विक चिंतन ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या पुस्तकात मांडले आहे. आजच्या मानवी जगण्यातील या महत्त्वाच्या विषयाला तरुण वयातच हात घालत त्याचा तात्त्विक अंगाने विचार करून युवा पिढीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी यशराजदादा देसाई यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. लवकरच हे पुस्तक अमेझॉन, किंडल आणि पुस्तकाची प्रकाशनसंस्था असलेल्या एपीके प्रकाशनाच्या संकेतस्थळावर, तसेच क्रॉसवर्ड स्टोअरमध्ये उपलब्ध होईल.

Related Stories

किरण ठाकुर यांना खरी लोकमान्यता

Patil_p

सातारा : गोडोलीत चौपाटी झालीचं पाहिजे

datta jadhav

सातारा पोलिसांच्या जुगार अन् दारु अड्डय़ावर छापे

Patil_p

सातारा : कोरोनामुळे मोदक खरेदीला भक्तांचा अल्प प्रतिसाद

Archana Banage

जागतिक दर्जाची यकृत प्रत्यारोपण उपचार सुविधा

Patil_p

कौटुंबिक सोहळय़ाने वर्धापन दिन उत्साहात

Patil_p