वार्ताहर /पालये
श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज मांदे मंगेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तपोभूमी दिनदर्शिका 2023 व उटणे अनावरण मांदे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते झाले. सद्गुरु माऊलींचे कार्य गोव्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू आहे. या कार्यात आपले सदैव सहकार्य असणार, असे उद्गार आमदार जीत आरोलकर यांनी काढले.
तपोभूमी दिनदर्शिका ही गोव्यातील एकमेव दिनदर्शिका गावागावातील उत्सवाची माहिती तसेच दत्त पद्मनाभ पिठाचे देव देश व धर्माचे कार्य प्रत्येक गोमंतकीयांच्या घरापर्यंत सद्गुरु माऊलींच्या आशीर्वादाने पोहचत आहे. तसेच तपोभूमीवर चालणाऱया शैक्षणिक, धार्मिक कार्याची माहिती घराघरात दिनदर्शिकेच्या माध्यमातून पोहोचवली जात आहे, असे मांदे विभागाचे क्षेत्रीय प्रमुख महेश गोडकर यांनी सांगितले. कार्यक्रमास उपस्थित मांदेचे ज्ये÷ गुरुबंधू विषयकांत राऊत, विठ्ठल सावंत, काशीनाथ दाभोलकर, गुरुदास गडेकर, दिनेश मयेकर, सखाराम पार्सेकर, मनोज मोरजकर, गौरेश कोरगांवकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत संजय कोरगावकर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रसाद राऊत यांनी केले.