वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 20 वर्षांमधील कामकाजावर आधारित पुस्तक ‘मोदी @20 ः ड्रीम्स मीटिंग डिलिव्हरी’चे प्रकाशन बुधवारी पार पडले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. नरेंद्र मोदी हे स्वप्न प्रत्यक्षात साकार केली जाऊ शकतात हे जगाला दाखवून देणारे नेते असल्याचे नायडू यांनी यावेळी म्हटले होते.
लेखकांनी एका प्रतिष्ठित नेत्याच्या 20 वर्षांच्या आकर्षक प्रवासाची रुपरेषा कुशलपणे जाणून घेत हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक एक दुर्लभ संकलन असून ते वाचकांना आधुनिक भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित नेत्यांपैकी एकाच्या विकासाबद्दल माहिती देणारे आहे. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले पंतप्रधान नरेंद्रभाई दामोदरदास मोदींनी मागील 20 वर्षांमध्ये भारतच्या इतिहासात सुमारे 13 वर्षांपर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि पंतप्रधानाच्या स्वरुपात 8 वर्षांपर्यंत एक अद्वितीय स्थान निर्माण केले असल्याचे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे.
विशिष्ट विचार प्रक्रियेचे विविध पैलू, सक्रीय दृष्टीकोन आणि सर्वोत्कृष्ट परिवर्तनकारी नेतृत्वशैली हे पुस्तक सादर करते. हे प्रकाशन निश्चितपणे पंतप्रधान मोदींना ‘डिकोड’ करण्यास मदत करणारे आहे. कशाप्रकारे नरेंद्र मोदी हे स्वतःच्या देशवासीयांसाठी मोठी स्वप्ने पाहण्यास साहस राखून आहेत हे समजविण्यास पुस्तक मदत करणारे असल्याचे नायडू यांनी मूद केले आहे.
लता मंगेशकरांची प्रस्तावना
या पुस्तकात एकूण 21 अध्याय असून ते पंतप्रधान मोदींच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतील. सर्व अध्याय विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी गेलेल्या महनीयांकडून लिहिण्यात आले आहेत. या पुस्तकाची प्रस्तावना भारतरत्न लता मंगेशकर यांनी लिहिली आहे. या पुस्तकाचे संपादन ब्ल्यूक्राफ्ट डिजिटल फौंडेशनने केले आहे.