Tarun Bharat

पुलवामा चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे 2 दहशतवादी ठार

Advertisements

ऑनलाईन टिम / नवी दिल्ली

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले. ही चकमक काल रात्रभर चालू होती. गोळीबारात दोन अतिरेकी मारले गेल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणाहून दोन एके रायफल आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे.

काश्मिरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी रविवारी सांगितले की, “जैश-ए-मोहम्मदचे दोन अतिरेकी, पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले असून यात पोलिस हवालदार रियाझ अहमदची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा समावेश आहे. पुलवामा येथे १३ मे रोजी पोलीस हवालदार असलेले रियाज अहमदची हत्या करण्यात आली होती.”

अधिक माहिती सांगताना विजय कुमार म्हणाले की “या दहशतवाद्यांकडून दोन AK-47 रायफल जप्त करण्यात आल्या असून काही दहशतवाद्यांचा पुलवामा-गुंडीपोरा परिसरामध्ये शोध सुरू आहे.” ठार झालेले दोन्ही अतिरेकी स्थानिक होते मात्र, पोलिसांनी त्यांची ओळख उघड केली नाही.

दरम्यान, या वर्षी ३० जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाया वाढवल्या आहेत. काश्मीरमध्ये या वर्षात आतापर्यंत सुमारे ९० अतिरेकी मारले गेले आहेत.

Related Stories

नरेंद्र मोदी देशात फूट पाडत आहेत : राहुल गांधी

prashant_c

नियम धाब्यावर बसवून पार्ट्या करणाऱ्यांवर होणार कारवाई

Archana Banage

लडाखमध्ये ‘डार्क स्काय रिझर्व्ह’ची निर्मिती

Patil_p

अहमदाबाद स्फोटाच्या दहशतवाद्याचा पिता सप नेता

Patil_p

चिंताजनक! देशात मागील 24 तासात कोरोनाचे 35,178 नवे रूग्ण; 440 मृत्यू

Tousif Mujawar

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 85 हजारांवर

datta jadhav
error: Content is protected !!