वार्ताहर/ उचगाव
उचगाव येथील मठ गल्ली, गोजगे रोड येथील कृष्णा नावगेकर आणि चंद्रभागा नावगेकर यांच्या संयुक्त विद्यमाने पुंडलिक पूजन सोहळा आणि वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ वारकऱ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी हरिपाठ रामदास मुचंडीकर यांच्या उपस्थितीत, कीर्तन निरुपण निवृत्ती मुचंडीकर यांच्या उपस्थितीत आणि कीर्तन ज्ञानेश्वर भजनी मंडळ व पंचक्रोशीतील वारकरी उचगाव यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी हभप रामदास माऊती मुचंडीकर यांनी हरिपाठ, हभप बाळू माऊती भक्तीकर यांचे प्रवचन झाले. सायंकाळी कीर्तन आणि निरूपण हभप निवृत्ती मुचंडीकर यांनी केले.
यावेळी हभप माऊती मुचंडीकर, लक्ष्मण चंदगडकर, बाळू मांडेकर, बाळू चौगुले, मल्लाप्पा मेणसे, मल्लाप्पा मुतगेकर, यल्लाप्पा तरळे, माऊती नावगेकर, बाळू भक्तीकर या वारकऱ्यांना शाल, टोपी व धोतर देऊन सत्कार करण्यात आला.
या सर्व मान्यवरांचा सत्कार, स्वागत व आभार कृष्णा नावगेकर व चंद्रभागा नावगेकर या दांपत्याच्या हस्ते करण्यात आले.