Tarun Bharat

सारथी संस्थेस खारघरमधील भूखंड देण्यास मान्यता

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : नागरिकांना मास्क वापरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तर काही महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आलेत. या बैठकीदरम्यान नगर विकास विभागामध्ये सारथी संस्थेस खारघर येथील भूखंड देण्याचा निर्णय दिला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून राज्यातील जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. यावेळी या बैठकीत छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर ३७, मधील ३ हजार ५००चौ.मी.क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयात पोहचण्यापूर्वीच मंत्रालयातील बत्तीगूल झाली होती. आजच्या बैठकीमध्ये सारथी संस्थेला खारघरमधील भूखंड देण्यास मान्यता दिली आहे. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात हरभरा उत्पादन झाले असल्यामुळे खरेदी कालावधी २८ जूनपर्यंत वाढवण्याची केंद्र सरकारला विनंती करण्यात येणार आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई आहे. यामुळे अशा भागात टॅकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत ४०१ टँकर्सने पुरवठा करण्यात येत आहे. तसेच धरणामध्ये ३७ टक्के पाणीसाठा आहे. हरभरा उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यामुळे खरेदी कालावधी २८ जूनपर्यंत वाढविण्याची केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.

Related Stories

‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोन संशयितांची जामिनावर सुटका

datta jadhav

सातारा : शाळेत कोरोना प्रादुर्भाव झाल्यास मुख्याध्यापकांस जबाबदार धरू नये

Archana Banage

आर हरी कुमार यांनी स्विकारली नौदल प्रमुखपदाची सूत्रे

datta jadhav

वाढते खाजगीकरण हे धोकादायक…सहकार क्षेत्राला पुन्हा एकदा उर्जीत करण्याची गरज : शरद पवार

Abhijeet Khandekar

भिडे गुरूजींसह 80 जणांवर गुन्हा

Patil_p

भांडुप आग : दोषींवर कारवाई होणार : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Tousif Mujawar