Pune Accident News: नाशिकमधील बस दुर्घटनेची (Nashik Bus Fire) घटना ताजी असतानाच आता पुण्यात प्रवाशांनी भरलेली बस पेटल्याची माहिती समोर आली आहे. आगीमध्ये ही बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , पुणे जिल्ह्यातील घोडेगाव शिंदेवाडी गावाजवळ भरस्त्यातच या बसने पेट घेतला. या बसमधून 27 प्रवासी प्रवास करत होते. शॉर्ट सर्टिकमुळे या बसने पेट घेतला असावा,अशी शंका व्यक्त केली जाते आहे. बसमध्ये लागलेल्या आगीने प्रचंड नुकसान झालंय. बसमधील सीट,काचा आणि आतील बाजूचा पूर्णपणे कोळसा झाला आहे. या घटनेतून सुखरूप सुटलेल्या प्रवाशांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला.


previous post