Tarun Bharat

सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणाचे पुणे कनेक्शन?

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. मुसेवाला हत्या प्रकरणातील आठ शुटर्सची पंजाब पोलिसांनी ओळख पटवली आहे. त्यांचे फोटोही समोर आले असून, हे सर्वजण लॉरेन्स बिश्नोई टोळीतील असल्याचे सांगण्यात येते. या आठ जणांमधील दोन शुटर्स पुण्यातील असल्याचा संशय आहे. पंजाब पोलिसांनी संतोष जाधव आणि सौरव महाकाल या दोघांची पुणे पोलिसांकडून माहिती मागवली असून, त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे.

सिद्धू मुसेवाला याची मनसा जिल्ह्यात 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यात छापेमारी सुरू आहे. दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात आठ शुटर्सची ओळख पोलिसांनी पटवली आहे. त्यामध्ये पंजाबमधील तरनतारन येथील रहिवासी असलेल्या मनप्रीत सिंग मन्नूला पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली आहे. शुटर्सना रसद आणि वाहने पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पंजाबमधील तरनतारनमधून जगरूप सिंग याला तर भटिंडा येथून हरकमल उर्फ रानू याला अटक करण्यात आली. हरियाणाच्या सोनीपत येथून प्रियव्रत उर्फ फौजी आणि मनजीत उर्फ भोलू याला, राजस्थानच्या सीकर येथून सुभाष बनोडा याला अटक केली आहे. पुण्यातील संतोष जाधव आणि सौरव महाकाल यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोण आहे संतोष जाधव?
पुण्यातील आरोपी असलेला संतोष जाधव हा मंचरचा रहिवाशी आहे. मागील वर्षी 1 ऑगस्टला त्याने ओंकार उर्फ राण्या बाणखेलेची हत्या केली होती. हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. त्यातूनच त्यांचे खटके उडाले. त्यातूनच 1 ऑगस्ट 2021 रोजी दुचाकीवरून निघालेल्या ओंकारला भरदिवसा एकलहरे गावाजवळ अडवून संतोष जाधवने त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. तेव्हापासून तो फरार असून, मंचर पोलीस त्याचा शोध घेत होते.

Related Stories

मतमोजणीवेळी प्रतिनिधींनी सावध रहावे!

Patil_p

श्रद्धा हत्याकांडात नवा खुलासा, हत्येनंतर आफताबने मुंबईहून मागवले 37 बॉक्स

datta jadhav

स्वारद फाऊंडेशनतर्फे स्वच्छता मोहिम व औषध फवारणी

Tousif Mujawar

दसरा मेळाव्यासाठी शिवसेना हायकोर्टात

datta jadhav

50 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवा : शासनाचे आदेश

Tousif Mujawar

केरळमध्ये बर्ड फ्लूचे संकट

datta jadhav
error: Content is protected !!