Tarun Bharat

पुणे देशाची सांस्कृतिक राजधानी; नितीन गडकरींचे गौरवोद्गार

पुणे / प्रतिनिधी :

पुणे ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे; तर देशाची सांस्कृतिक राजधानी असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे काढले.

34 व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, गिरीष बापट, अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेता सुनील शेट्टी, ‘पुणे फेस्टिव्हल’चे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी, कृष्णकुमार गोयल, डॉ. सतीश देसाई आदी या वेळी व्यासपीठावर होते.

अधिक वाचा : धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा शेतकऱ्यांकडून निषेध; काळे झेंडे दाखवत ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा

उद्घाटन कार्यक्रमात ‘सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ तर, ज्ये÷ दिग्दर्शिका सई परांजपे, कायदेतज्ञ एस. के. जैन, राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, दिग्दर्शक-अभिनेते प्रविण तरडे, तर गायक राहुल देशपांडे यांना ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ने गौरविण्यात आले. शतकोत्तर गणेशोत्सव साजरा करणारे नवचैतन्य गणे मंडळ आणि राजषी शाहू गणेश मंडळासही सन्मानित करण्यात आले.

गडकरी म्हणाले, साहित्य, कला आणि संस्कृतीची परंपरा असलेल्या पुण्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची मांदियाळी आहे. उत्फूर्त दाद देण्याची वृत्ती हीच पुण्याची संपत्ती आहे. नागपूरचा विकसित होत असले, तरी मी आणि देवेंद्र फडणवीस पुण्याकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. विमानतळ, रिंग रोड, मेट्रो, चांदणी चौक याच्या कामावर आमचे लक्ष आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने मला मान आणि सन्मान दिला.

फडणवीस म्हणाले, ‘पुणे फेस्टिव्हल’ने पुण्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. राजमाता जिजाऊ यांनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवल्यापासून हे शहर नररत्नांची खाण झाले आहे. हेमा मालिनी, उदयनराजे भोसले, सई परांजपे यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश कलमाडी यांनी प्रास्ताविक केले. गोयल यांनी आभार मानले.

Related Stories

“मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय”

Archana Banage

मुंबई-नागपाडा परिसरात मनसे पदाधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण ; व्हिडिओ व्हायरल

Archana Banage

कोयना एक्सप्रेस पहिल्यांदाच ‘इलेक्ट्रिक इंजिन’वर धावली

Archana Banage

पुणे वन विभागाच्या अखत्यारीतील उद्याने सर्वांसाठी खुली करा : निलम गोऱ्हे

Tousif Mujawar

खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेला दिसून आलंय, अजूनही सर्वांसाठी दरवाजे खुले; आदित्य ठाकरे

Abhijeet Khandekar

कोरोना काळात अंगणवाड्यांचे कार्य कौतुकास्पद

Abhijeet Khandekar