ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील सनसिटी भागात दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली. मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांनी एकाच्या दिशेने तीन राऊंड फायर केले. त्यानंतर परिसरात दहशत माजवून हल्लेखोर फरार झाले. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात एकजण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.