Tarun Bharat

पुणेरी पलटण उपांत्य फेरीत दाखल

वृत्तसंस्था/ हैदराबाद

नवव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेत पुणेरी पलटण संघाने सोमवारच्या सामन्यात पाटणा पायरेटस्चा 44-30 अशा 14 गुणांच्या फरकाने पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

पुणेरी पलटण आणि पाटणा पायरेटस् यांच्यातील सामन्यात पुणेरी पलटणतर्फे आकाश शिंदे आणि मोहमद नबीबक्ष यांची कामगिरी दर्जेदार झाली. या सामन्यात आकाश शिंदे 13 तर मोहमदने 9 गुण मिळवले. सामन्याच्या सुरुवातीला आकाश शिंदेच्या शानदार चढायाच्या जोरावर पुणेरी पलटणने पाटणा संघावर आघाडी मिळवली. पुणेरी पलटण संघातील इराणचा अष्टपैलू मोहमद नबीबक्षने आपल्या चढायावर पायटेस्चे अधिक गडी बाद केले. मध्यंतराला केवळ एक मिनिट बाकी असताना पाटणा पायरेटस्चे सर्व गडी बाद झाले आणि पुणेरी पलटणने 19-10 अशी आघाडी मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धात पुणेरी पलटण आपली आघाडी अधिकच भक्कम केली. सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना पुणेरी पलटणने 43-19 अशी बढत पाटण पायरेटस्वर मिळवली होती पण शेवटच्या पाच मिनिटांच्या कालावधीत पाटणा पायरेटस्च्या मोहमदेजाने दर्जेदार चढायावर आपल्या संघाला 11 गुण मिळवून दिल्याने पुणेरी पलटणने हा सामना 14 गुणांच्या फरकाने जिंकला.

Related Stories

विश्व टेटे स्पर्धेत भारताची किमान दोन पदके निश्चित

Patil_p

विराट ‘बॅड पॅच’वर निश्चितपणाने मात करेल

Amit Kulkarni

महेला जयवर्धने लंकेचा सल्लागार प्रशिक्षक

Patil_p

भारत-अर्जेंटिना महिला हॉकी सामना बरोबरीत

Patil_p

रोहित शर्मा कोरोनाबाधित

Patil_p

पंतप्रधान मदतनिधीसाठी सनरायजर्स हैदराबादची 10 कोटींची मदत

Patil_p