Tarun Bharat

प्लास्टिक बंदीअंतर्गत नागरिकांवरही दंडात्मक कारवाई

Advertisements

महापालिकेकडून जनजागृती सुरू

प्रतिनिधी /बेळगाव

प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. दि. 1 जुलैपासून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी महापालिकेने जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. आठ दिवस जनजागृती उपक्रम राबवून त्यानंतर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. विपेत्यांसह प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱया नागरिकांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने कचऱयाच्या प्रमाणात वाढ होत आहे. विघटन न होणाऱया प्लास्टिकमुळे प्रदूषण वाढले आहे. एकूण कचऱयाच्या 40 टक्के कचरा हा प्लास्टिक पिशव्यांचा होत आहे. एकदाच वापरण्यात येणाऱया प्लास्टिक पिशव्या पर्यावरणास घातक ठरत आहेत. त्यामुळे देशभर प्लास्टिक बंदी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची सूचना केंद्रीय प्रदूषण मंडळ आणि केंद्र शासनाने केली आहे. त्यामुळे दि. 1 जुलैपासून प्लास्टिक बंदीसाठी आवश्यक कारवाई सुरू करण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल

दि. 1 जुलैपासून शहरात प्लास्टिक बंदीसाठी जागृती केली जाणार आहे. कचरा जमा करणाऱया वाहनांद्वारे प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची रॅली काढून प्लास्टिक बंदीची जागृती केली जाणार आहे. प्रारंभी सात दिवस जागृती करून त्यानंतर दंडात्मक कारवाई होणार आहे.

यापूर्वी केवळ प्लास्टिक विपेते आणि व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र आता प्लास्टिक बंदी कायद्यानुसार प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱया नागरिकांवरही कारवाई केली जाणार आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने आवश्यक कृती आराखडा तयार केला आहे. तसेच दि. 1 जुलैपासून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यास प्रारंभ केला आहे.

Related Stories

जुन्या म.फुले रोडचे अखेर डांबरीकरण

Patil_p

लोकमान्यच्या भाग्यनगर शाखेमध्ये महिला दिन

Amit Kulkarni

अधिकाऱयाने ओकली गरळ, कॉन्स्टेबलनी केले सरळ!

Amit Kulkarni

सेंट झेवियर्स अंतिम फेरीत

Amit Kulkarni

जलाराम फौंडेशनच्यावतीने कोरोना वॉरियर्सचा सत्कार

Patil_p

बेंगळूर येथील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांमुळे राज्यभर खबरदारीच्या सूचना

Amit Kulkarni
error: Content is protected !!