ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाबच्या पटियालामध्ये (panjab patiala) शिवसेनेने आज खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढला होता. या मोर्चाविरोधात शीख संघटेनेच्या युवकांनी शिवसैनिकांना माकड सेना म्हणत मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यावेळी काली माता मंदीर परिसरात शीख संघटना आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. दोन्ही गटात धुमश्चक्री उडाली. (a big clashes between shivsena and sikh parties) दगडफेकही करण्यात आली. नंग्या तलवारीही नाचविण्यात आल्या. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना 15 वेळा हवेत गोळय़ाही झाडाव्या लागल्या. यावेळी खलिस्तानी समर्थकाने केलेल्या तलवार हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी (police jnjured) जखमी झाला.
सिख फॉर जस्टिसचे कन्वीनर गुरपतवंत पन्नू यांनी 29 एप्रिल रोजी खलिस्तान स्थापना दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे पंजाबमधील कार्यकारी प्रमुख हरिश सिंगला यांच्या नेतृत्वाखाली आज खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढला होता. शिवसैनिक खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. या मोर्चाविरोधात शीख संघटेनेचे युवक शिवसैनिकांना माकड सेना म्हणत मुर्दाबादच्या घोषणा देत होते. यावेळी अनेक शीख संघटना आणि हिंदू कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यानंतर पोलिसांना जमावाला पांगवण्यात तारेवरची कसरत करावी लागली. यावेळी पोलिसांसमोरच दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. काहींनी तर तलवारी काढून हवेत मिरवल्या. त्यामुळे आणखी तणावाचं वातावरण निर्माण झालं. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना 15 वेळा हवेत गोळीबार करावा लागला. यावेळी खलिस्तानी समर्थकांनी पोलिसांवर तलवार हल्ला केला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.