Tarun Bharat

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ

ऑनलाईन टीम/तरुण भारत

आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Ppunjab CM Bhagwant Mann) पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. डॉ.गुरप्रीत कौर (DR. Gurprit kour) यांच्याशी त्यांचा दुसरा विवाह होणार आहे. ४८ वर्षीय भगवंत मान यांनी २०१५ मध्ये पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर त्यांची पत्नी मुलांसह अमेरिकेत गेल्या आहेत.

दरम्यान, भगवंत मान यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून त्यांची पहिली पत्नी आणि मुले अमेरिकेत राहिला गेले आहे. भगवंत मान पंजबचे मुख्यमंत्री झाले तेंव्हा त्यांची दोन्ही मुले शपथविधी सोहळ्याला आली होती. भगवंत मान यांच्या आईची इच्छा होती, त्याने दुसर लग्न कराव. भगवंत मान यांचा विवाह मुख्यमंत्र्यांच्या आई आणि बहिणीने निवडलेल्या मुलीशी म्हणजेच डॉ. गुरप्रीत कौरशी होणार आहे.

हे ही वाचा : …तर आम्ही सर्वजण मातोश्रीवर परत जाऊ – संजय राठोड

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या म्हणजे ७ जुलै २०२२ रोजी दुसरे लग्न करणार आहेत. चंदिगडच्या सीएम हाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. डॉ.गुरप्रीत कौर यांच्याशी त्यांचा दुसरा विवाह होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवंत मान यांचा विवाह सोहळा थाटामाटात होणार नाही. या विवाहासाठी मान यांनी जवळच्या कुटुंबीयांना व मित्रांनाच आमंत्रण दिलं आहे. असं असलं तरी आम आदमी पक्षाचे सर्व मोठे नेते या सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे. या सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी आम आदमी पक्षाचे पंजाबचे प्रभारी राघव चड्डा यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Related Stories

आर्यन खान प्रकरणावरुन हिवाळी अधिवेशनात होणार गदारोळ

datta jadhav

…तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

datta jadhav

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पोलाद प्रकल्पाचे भूमीपूजन

Patil_p

अग्निपथ योजनेतील भरती प्रक्रिया दोन दिवसात सुरु होणार ; लष्कर प्रमुखांची घोषणा

Archana Banage

मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक सार्वजनिक केला: मनीष तिवारी

Archana Banage

अमोल मिटकरींच्या निशाण्यावर मोहित कंबोज; म्हणाले, कोणाच्या चड्डीचा नाडा आहे…

Abhijeet Khandekar