Tarun Bharat

केएल राहुलला रोखण्याची पंजाब किंग्सची महत्त्वाकांक्षा

Advertisements

लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध पंजाबचा आयपीएल साखळी सामना आज : केएल राहुलचे  हंगामात  आतापर्यंत 368 धावांचे योगदान, गुणतालिकेत सरस कामगिरीसाठी लखनौचे प्रयत्न

सुकृत मोकाशी /पुणे

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आज (शुक्रवार दि. 29) होणाऱया आयपीएल साखळी सामन्यात बहरातील कर्णधार केएल राहुलला स्वस्तात बाद करणे, हे पंजाब किंग्सचे प्रारंभिक लक्ष्य असणार आहे. केएल राहुलने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात 368 धावांची आतषबाजी केली असून सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत तो दुसऱया स्थानी विराजमान आहे. पुण्यातील सर्व सामने ‘हाय स्कोअरिंग थ्रिलर्स’ झाले असल्याने आजही धावांची आतषबाजी झाली तर आश्चर्याचे कारण नसेल. आजची लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.

केएल राहुलने सातत्यपूर्ण फलंदाजी साकारत यंदा 2 शतके झळकावली असून विशेष म्हणजे ही दोन्ही शतके मुंबई इंडियन्सविरुद्ध आहेत. कॅगिसो रबाडाच्या नेतृत्वाखाली पंजाबची गोलंदाजी लाईनअप बऱयापैकी समतोल असून त्यामुळे केएल राहुलशी जुगलबंदी रंगणे अपेक्षित आहे. रबाडा, अर्शदीप विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये अधिक लक्षवेधी मारा करत आले असून संदीप शर्मा, रिषी धवन, राहुल चहर यांनाही केएल राहुलला स्वस्तात बाद करण्यासाठी रणनीती सुसज्ज ठेवणे आवश्यक असेल. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात कोण किंग ठरणार, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. दोन्ही संघांनी मागील सामने जिंकल्याने आपली विजयी घौडदौड कायम ठेवण्यास ते उत्सुक असतील. आयपीएलचा पहिलाच हंगाम खेळणाऱया लखनौने चांगली भरारी घेतली आहे. त्यामुळे पंजाबविरुद्ध लखनौचे पारडे जड असू शकते.

आयपीएलच्या गुणतालिकेत गुरुवारच्या सामन्यापूर्वी पंजाबचा संघ सहाव्या स्थानावर होता. लीगमधील त्यांच्या 8 सामन्यांमधून 4 विजय आणि 4 पराभवांसह 8 गुण झालेले आहेत.

शिखर धवन, लिव्हिंगस्टोनमुळे पंजाबची फलंदाजी मजबूत

पंजाबकडे शिखर धवन, लिव्हिंगस्टोन हे दोन फलंदाज फॉर्मात असल्याने चिंतेचे कारण नाही. चेन्नईविरुद्ध अर्धशतकी खेळी करून धवनने पंजाबला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली होती. तोच फॉर्म कायम ठेवण्यासाठी धवन प्रयत्न करताना दिसेल. कर्णधार मयांक अगरवाल, जॉनी बेअरस्टो तसेच एम. शाहरुख खान यांना धावा करण्यासाठी झगडावे लागत आहे. हा सामना जिंकायचा असेल, तर या सर्वांना कामगिरीत सुधारणा करावी लागेल. त्यांच्या साथीला जितेश शर्मा, ओडियन स्मिथ असतील. रबाडा, संदीप शर्मा, रिषी धवन हे फास्ट बॉलिंगची बाजू सांभाळतील. फिरकी आघाडी सांभाळणाऱया राहुल चहरलाही या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यालाही चांगली गोलंदाजी करावी लागेल.

संभाव्य संघ

पंजाब किंग्स : मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, अर्शदीप सिंग, कॅगिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, ऋतिक चटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन इलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्ष, बेन्नी हॉवेल.

लखनौ सुपरजायंट्स : केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, इव्हिन लुईस, मनीष पांडे, क्विन्टॉन डी कॉक, रवि बिश्नोई, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मोहसिन खान, मयांक यादव, अंकित रजपूत, अवेश खान, ऍन्डय़्रू टाय, मार्कस स्टोईनिस, काईल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंडय़ा, जेसॉन होल्डर.

सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.

Related Stories

रिसेकी, कॉलिन्स, टॉमलिजेनोव्हिक विजयी

Patil_p

रावळपिंडी कसोटीसाठी बांगलादेश संघ जाहीर

Patil_p

आयपीएल स्पर्धेत कोठेही खेळण्यास भुवनेश्वर सज्ज

Patil_p

लखनौमध्ये होणार कसोटी क्रिकेटचे पुनरागमन

Patil_p

हार्दिक पांडय़ाच्या सरावाला प्रारंभ

Patil_p

सायना, श्रीकांत, प्रणॉय दुसऱया फेरीत

Patil_p
error: Content is protected !!