Tarun Bharat

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालांची गोळ्या झाडून हत्या

ऑनलाईन टीम/तरुण भारत

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (sidhu moose wala) यांची मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात इतर दोघे जखमी झाले आहेत. पंजाबमधील भगवंत मान सरकारने ४२४ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. विशेष म्हणजे सुरक्षा काढून घेतलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसे वाला यांचा सामावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याचा ठीक एका दिवसानंतर ही घटना घडली आहे.

दरम्यान, एक दिवसापूर्वीच शनिवारी पंजाबमधील भगवंत मान (bhagwant mann) सरकारने मूसेवाला यांची व्हीआयपी सुरक्षा काढून घेतली होती. त्यांनतर लगेच एक दिवसानंतर अज्ञात वक्तींनी हल्ला केला आहे. हल्ला झाल्यानंतर मूसेवाला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला यांची मानसा गावात काही गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. अत्यावस्थ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मूसेवाला यांच्या हत्येनंतर पंजाब सरकारवर टीका केली जात आहे. एक दिवसापूर्वीच भगवंत मान सरकारने मूसेवाला यांच्यासह ४२४ लोकांची पोलीस सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती.

Related Stories

श्रीलंकेत महागाईचा भडका !

Archana Banage

ईडीच्या पाच अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा, मुख्यालय सील

datta jadhav

संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर कोल्हापूरात ‘हर हर महादेव’चे शो बंद

datta jadhav

Kolhapur : यड्रावकरांनी गद्दारी केली, पण आता जातीवर मतदान नको- सुषमा अंधारे

Abhijeet Khandekar

अभिनेता पर्ल वी पुरीला अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

Tousif Mujawar

…म्हणुन भाजप, काँग्रेसवाले मला शिव्या द्यायला लागले – अरविंद केजरीवाल

Abhijeet Khandekar