7 हजार कोटीचा महसूल मिळण्याची आशा
वृत्तसंस्था/ मुंबई
बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड यांनी कांदीवली मुंबई येथे 18.6 एकरची जागा खरेदी केली आहे. या जागेवर कंपनी आगामी काळामध्ये प्रिमीयम गटातील गृहबांधणी प्रकल्प उभारणार
आहे.
सदरच्या प्रकल्प उभारणीमधून कंपनीला आगामी काळामध्ये 7 हजार कोटीचा महसूल मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोदरेज प्रॉपर्टीजने सदरची माहिती नुकतीच शेअरबाजाराला दिली आहे.
रहिवाशी इमारतीसह रिटेलसाठीही प्रकल्पातील जागा दिली जाणार आहे. कंपनीचा हा सर्वात मोठा असा रहिवासी बांधकाम विकास प्रकल्प असणार असून
यायोगे पश्चिम मुंबईमध्ये कंपनीचे आगामी काळात अस्तित्व अधिक बळकट होणार आहे.
16 हजार 500 कोटीचा महसूल
यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीचा हा आठवा प्रकल्प असणार आहे. विविध प्रकल्पाच्या माध्यमातून आर्थिक वर्ष 2023 मध्ये बुकिंगच्या माध्यमातून 16500 कोटी रुपये कंपनीच्या पदरात पडतील, असाही अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.