Tarun Bharat

दिव्यांगांसाठी होणार पर्पल महोत्सव

प्रतिनिधी /पर्वरी

गोवा हे दिव्यागासाठी विशेष महोत्सव घडवून आणणारे पहिले राज्य असून जसे गोवा हे इफ्फीसाठी जगात प्रसिद्ध आहे तसेच दिव्यागाच्या पर्पल महोत्सवासाठी होणार आहे.त्याच बरोबर दिव्यागासाठी पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाणार आहे.असे उद्गार समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी  येथील सचिवालयाच्या सभागृहात आयोजित दिव्यांगासाठी होणाऱया पर्पल महोत्सवाविषयी माहिती देताना काढले.

 यावेळी त्यांच्यासमवेत दिव्यांग आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, संचालक संध्या कामत,सचिव सुभाष चंद्र, सचिव ताह अजीज ,केतन भाटीकर,सुदेश गावडे,राहुल कुंकळीकर उपस्थित होते.

पर्पल महोत्सवनिमित्त पणजीतील विविध स्थळावर दिव्यांगा जाण्यासाठी विशेष सोय केली जाणार आहे. सरकार दिव्यानगाच्या सोयीवर भर देणार असून त्यांच्यासाठी पर्यटन सुलभ केले जाणार आहे. पर्पल महोत्सव साठी आतापर्यंत तीन हजार हुन अधिक नोंदणी झाली आहे.हा महोत्सव समाज कल्याण खाते आणि दिव्यांग आयुक्तालय तर्फे केला असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे सहकार्य लाभणार आहे. तसेच अन्य सामाजिक संस्थानचे सहकार्य लाभणार आहे. अशी माहिती मंत्री फळदेसाई यांनी दिली.

समाज कल्याण खाते आणि मनोरंजन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ता. 6 ते 8 जानेवारी 2023 रोजी पणजी येथे होणार असून तीन महत्वाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यात अखिल भारत खुली पेरा टेबल टेनिस स्पर्धा ता. 7 जानेवारी कांपाल येथील स्पोर्ट्स ग्राऊंड वर  होणार आहे. यात गोवा ,राजस्थान व अन्य राज्यातून  जवळजवळ 150 खेळाडू भाग घेणार आहेत. विजेत्याना 20 सुवर्ण पदक, 20 रौप्य पदक आणि 40 कास्य पदके देणार आहेत.जीनो फार्मसीटिकल हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. दूसरा कार्यक्रम गोवा अंध संघटने तर्फे अंतर राज्य अंध क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात गोवा, झारखंड,छत्तीसगड ,पोडीचारी,केरळा,तेलंगणा अशी सहा राज्ये भाग घेणार आहेत. ही स्पर्धा ता. 5 जानेवारी रोजी गोवा क्रिकेट असोसियेशन यांचा सहकार्याने पर्वरी आणि पणजी येथे खेळण्यात येणार आहे. ही स्पर्धा टी- 20   स्वरूपाची असून ‘अ’ गोवा, झारखंड,छत्तीसगड आणि ‘ब’ पोडीचारी,केरळा,तेलंगणा अशा  दोन गटात खेळली जाणार  आहे. अंतिम सामान्य ता.8 जानेवारी रोजी  खेळला जाणार आहे. तिसरा कार्यक्रम दहावी आंखिल भरती “मिस आणि मिस्टर बहिरे 2023’ स्पर्धा होणार आहे.यातील विजेत्याला जागतिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा गोवा बहिरे संघटना तर्फे घेण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या  स्पर्धाचे गोव्यात पहिल्यांदाच आयोजन केले जात आहे. त्याच बरोबर अन्य विविध सांस्कृतिक, व्याख्याने, चर्चासत्र,असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती दिव्यांग आयुक्त गुरु प्रसाद पावसकर यांनी दिली.         

देशातील दिव्यांग व्यक्तीना त्यांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात सामावून घेणे हेतूने हा ‘पर्पल फेस्ट’ नावाचा  तीन दिवसांचा महोत्सव घडवून आणला आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच महोत्सव आहे. दिव्यांग लोकांना एकत्र आणणे हे खूप जिकिरीचे काम आहे कारण प्रत्येक व्यक्तीची कमतरता जाणून घेऊन त्यांना त्यानुसार साधन सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. आयोजनाने गोव्याचे नाव आणखी उंचवणार आहे.  सरकार हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.  समाजामध्ये दिव्यांग लोकविषयी आपुलकी निर्माण करणे,दिव्यांग व्यक्ती मधील न्यूनगंड दूर करणे व त्यांना समाजातील प्रमुख प्रवाहमध्ये सामावून घेणे हा या  महोत्सव घेण्यामागचा प्रमुख हेतु आहे. या तीन दिवसात वेगवेगळी चर्चा सत्रे,मनोरंजनाचे कार्यक्रम,प्रदर्शन,अनुभव कथन,गाणी नृत्य  अशा  भरगच्च कार्यक्रमांकही रचना केली आहे. आतापर्यंत देशभरातील तीन हजार  दिव्यांग लोकानी आणि संस्थानी नाव नोंदणी केली आहे.हा आकडा वाढण्याची शक्मयता आहे. असे समाज कल्याण मंत्री  फळदेसाई यांनी सांगितले.

Related Stories

भाजपाचा आणखीन एक यु-टर्न : आपचा आरोप

Amit Kulkarni

पाच पालिकांचा आज निकाल

Amit Kulkarni

सेरुला भूखंडप्रकरणी तीन आठवडय़ात उत्तर सादर करा

Patil_p

रिकार्डो डिसोझा यांच्याकडून टिटो क्लब विकल्याची घोषणा

Amit Kulkarni

सोनसडय़ावर बायोमिथेनेशन प्रकल्प लादण्याचा घाट : शिरोडकर

Amit Kulkarni

वादग्रस्त आयआयटी प्रकल्प आता पेडण्यात येणार

Amit Kulkarni