Tarun Bharat

दिव्यांगासाठी जानेवारीत ‘पर्पल महोत्सव’

Advertisements

समाजकल्याणमंत्री सुभाष फ्ढळदेसाई यांची माहिती : इफ्फीच्या धर्तीवर तीन दिवस भरगच्च कार्यक्रम,सीएसआरच्या माध्यमातून खर्च करणार तीन कोटी

प्रतिनिधी /पणजी

राज्य दिव्यांग आयुक्त, समाजकल्याण खाते व गोवा मनोरंजन सोसायटी यांच्या विद्यमाने दिव्यांगासाठी देशासह गोव्यातील पहिला ‘पर्पल महोत्सव’ नवीन वर्षात दि. 6 ते 8 जानेवारी 2023 असे तीन दिवस आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फ्ढळदेसाई यांनी पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या महोत्सवात सुमारे पाच हजार लोक भाग घेणार आहेत. महोत्सवात चित्रपट, सांस्कृतिक मनोरंजनाचे कार्यक्रम, स्पर्धा, शैक्षणिक, क्रीडा उपक्रम, चर्चा, परिसंवाद यांचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या धर्तीवर हा महोत्सव आखण्यात येणार आहे, असे मंत्री फ्ढळदेसाई यांनी सांगितले.

सीएसआरमधून करणार खर्च

महोत्सवाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून त्यासाठी रूपये तीन कोटी खर्च होणार आहे. हा निधी सीएसआर निधीतून खर्च करावा, अशी शिफ्ढारस राज्यपालांनी केली आहे. सरकारने या महोत्सवासाठी संकल्पना, आर्थिक सहाय्य या करीता प्रस्ताव मागवले असून ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री फ्ढळदेसाई यांनी केले आहे.

दिव्यांगांना खुलेपणाने फिरण्याची सोय

पणजी शहर दिव्यांगासाठी 100 टक्के फ्ढिरण्यासाठी खुले करण्याची योजना सरकारने आखली असून पणजीतील 45 सरकारी इमारतीत त्यांना मोकळेपणाने फ्ढिरता यावे म्हणून सोय करण्यात येणार आहे. त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य आणि सोयी पुरविण्यासाठी सरकार वचनबध्द आहे.

राज्यात 19 हजार दिव्यांगांची नोंद

राज्यातील सर्व दिव्यांगाना शोधून काढण्याचे काम स्वयंपूर्ण मित्रांना देण्यात आले असून सुमारे 19,000 दिव्यांगाची नोंद समाजकल्याण खात्याकडे झाली आहे. त्यांना वैद्यकीय सेवा, चांगले शिक्षण देण्यावरही सरकार भर देणार आहे, अशी माहिती फ्ढळदेसाई यांनी दिली.

दिव्यांगाना सरकारी नोकरीत प्राधान्य

दिव्यांगाना सरकारी नोकरीत 4 टक्के राखीवता असून मार्गदर्शक तत्त्वे, नियम, अटीनुसार त्यांना नोकरीत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. मागील प्रतिक्षा यादी अद्याप संपलेली नाही. त्यांना नोकरीत प्रथम प्राधान्य मिळणार असून सर्वांनाच नोकरी करणे अशक्य आहे. ज्यांना नोकरी करणे शक्य आहे आणि जे नोकरीसाठी योग्य आहेत त्यांना ती देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री सुभाष फ्ढळदेसाई यांनी दिले.

Related Stories

कुंभारजुवे मतदारसंघात बदलासाठी मला निवडावे

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांचे ते आश्वासन आपल्यासाठी अभिमानाचा क्षण : युरी आलेमाव

Amit Kulkarni

कोरोनाच्या बळींना रु.2 लाखाची मदत

Amit Kulkarni

भूमिपुत्र विधेयक मागे घेणार : मुख्यमंत्री

Amit Kulkarni

म्हापसा भोवताल परिसरातील दुचाक्या चोरणाऱया अट्टल चोरटय़ास अटक

Patil_p

‘विश्वजीत फडते’ झळकणार फौलाद खानाच्या भूमिकेत

Amit Kulkarni
error: Content is protected !!