Tarun Bharat

गडचिरोलीत ‘पुष्पा’ स्टाईल सागवान तस्करी, नदीतून 37 ओंडके जप्त

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Teak smuggling in Gadchiroli गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातून वाहणाऱ्या कर्जेली नदीतून पुष्पा स्टाईल सागवानाची तस्करी करण्यात येत होती. झिंगानूर वनविभागाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, वनविभागाच्या पथकाने 6.456 घन मीटर आकाराचे सागवानाचे 37 ओंडके जप्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जेली नदीच्या काठावर कत्तल केलेल्या सागवान झाडाचे ओंडके लपवून आणि त्यांचे तराफे बनवून नदीपात्रातून तस्करी केली जात होती. झिंगानूर वनविभागाला याची माहिती मिळताच दोन पथके घटनास्थळी पाठविण्यात आली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. यावेळी वनविभागाने केलेल्या कारवाईत सागवानाचे 37 ओंडके जप्त केले आहेत. त्याची किंमत अंदाजे 4.66 लाख एवढी आहे. याप्रकरणी वनविभागाने संबंधितांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सिलिंडरचा स्फोट; नवजात बालकांना इजा

Related Stories

वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

Abhijeet Shinde

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया; म्हणाले, राजकीय चर्चा नाही…

Archana Banage

पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य

datta jadhav

अल्पवयीन मुलीचे अपहरण

Patil_p

रायगड-हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट; बोटीतून मोठा शस्त्रसाठा जप्त

Abhijeet Shinde

सातारा जिल्हय़ात कोरोनामुक्तीचा डंका : एकाच दिवशी 47 मुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!