वृत्तसंस्था/ मुंबई
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंडय़ाला रविवारी पहिल्या पुत्ररत्नाचा लाभ झाला. कृणालने या मुलाचे कविर असे नामकरण केले आहे. आपल्या ट्वीटरवर कृणाल पंडय़ाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
2017 च्या डिसेंबरमध्ये कृणालचा विवाह पंखुरी शर्माबरोबर झाला होता. पंखुरी आयपीएल स्पर्धेवेळी कृणालचा खेळ पाहण्यासाठी वारंवार उपस्थिती दर्शवित होती. 2021 च्या जुलैमध्ये कृणालने लंकेविरुद्ध भारताचे शेवटचे प्रतिनिधीत्व केले होते. अष्टपैलू कृणालने भारतातर्फे 5 वनडे आणि 19 टी-20 सामन्यात प्रतिनिधीत्व केले असून त्याने 2018 साली इंग्लंडविरुद्ध आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 2022 च्या आयपीएल स्पर्धेत त्याने लखनौ सुपर जायंटस् संघाबरोबर करार केला होता. लखनौ सुपर जायंटस् संघाला 2022 च्या आयपीएल स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.