Tarun Bharat

वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून पीव्ही सिंधू बाहेर

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

माजी वर्ल्ड चॅम्पियन व भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार नाही. डाव्या गुडघ्याला झालेल्या स्ट्रेस प्रॅक्चरमुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे जाहीर करण्यात आले. बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीदरम्यान तिला ही दुखापत झाली असल्याचे तिचे वडील पीव्ही रामण्णा यांनी नमूद केले. कौतुकाची बाब म्हणजे दुखापतग्रस्त असतानाही सिंधू बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत वेदना सोसत कोर्टवर उतरुन संघर्षमय खेळ साकारला आणि ऐतिहासिक सुवर्ण जिंकले होते.

सिंधूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 5 पदके जिंकली असून यात सुवर्णपदकाचा देखील समावेश आहे. सिंगापूर ओपन व राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपबद्दलही सिंधू महत्त्वाकांक्षी होती. पण, सारे काही आपल्या हातात नसते, असे रामण्णा याप्रसंगी म्हणाले. ऑक्टोबरच्या मध्यात डेन्मार्क व पॅरिस ओपनमध्ये पुनरागमन करणे, हे सिंधूचे लक्ष्य असेल, याचा त्यांनी येथे उल्लेख केला.

Related Stories

पोखरणमध्ये दिसणार वायुसेनेची ताकद

Patil_p

अभिषेक बॅनर्जींच्या नातेवाईकाला रोखले

Patil_p

छत्तीसगड : चार नक्षलवाद्यांना कंठस्नान, पोलीस उपनिरीक्षक शहीद

Rohan_P

केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

किरकोळ महागाई दरात घट

Patil_p

संरक्षणाकरता 5.25 लाख कोटींची तरतूद

Patil_p
error: Content is protected !!