Tarun Bharat

पीव्हीआर 100 नवीन स्क्रीनसाठी करणार 350 कोटींची गुंतवणूक

Advertisements

वृत्तसंस्था/ मुंबई

 मल्टीप्लेक्स चेन ऑपरेटर पीव्हीआर सिनेमाने चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 100 नवीन क्रीन लाँच करण्याची योजना आखली आहे. यासाठी कंपनीने 350 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना निश्चित केली आहे.   पीव्हीआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता यांनी ही माहिती दिली.

पीव्हीआर आणि आयनॉक्स लीझरचे विलीनीकरण पुढील वर्षी फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर दोन्ही कंपन्या संयुक्तपणे काम करतील. या वर्षी एप्रिल-जून तिमाहीतील कंपनीच्या कामगिरीचा संदर्भ देत ते म्हणाले की, ग्राहक सिनेमाचा अनुभव घेण्यासाठी पुन्हा हॉलमध्ये येत आहेत. याशिवाय खाद्यपदार्थ आणि शीतपेयांची विक्रीही वाढत आहे, ज्यामुळे आम्हाला विस्तारासाठी अधिकची संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दत्ता यांनी भर दिला की विस्तार संपूर्ण भौगोलिक क्षेत्रांमध्ये संतुलित असेल. ते म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात 350 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 100 क्रीन सुरू करण्याची आमची योजना आहे. ते पुढे म्हणाले, की सुमारे 60 टक्के नवीन क्रीन अशा शहरांमध्ये असतील जिथे कंपनीची आधीच उपस्थिती आहे, तर उर्वरित क्रीन इतरत्र उघडली जातील. त्याचा विस्तार करण्याचा मानस असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.

Related Stories

अंबुजा सिमेंटचा समभाग झळाळला

Patil_p

युक्रेन-रशिया तणावामुळे शेअर बाजार घसरणीसह बंद

Patil_p

कल्याण ज्वेलर्सच्या 150 व्या शाखेचे उदघाटन

Patil_p

पुराणिक बिल्डर्सचा येणार आयपीओ

Amit Kulkarni

युटीआय म्युच्युअल-माझगाव डॉकचा आयपीओ 29 सप्टेंबर रोजी

Patil_p

क्लिन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा लवकरच आयपीओ

Patil_p
error: Content is protected !!