Tarun Bharat

चटपटीत आणि झटपट होणारा तवा पुलाव

चटपटीत आणि चविष्ट असणारा तवा पुलाव सर्वानाच आवडतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण हा पुलाव आवडीने खातात.शिवाय यामुळे इतर वेळी खाल्ल्या न जाणाऱ्या भाज्याही मुलांच्या पोटात जातात. आज आपण हॉटेलपेक्षाही स्वादिष्ट आणि घरच्या घरी झटपट होणारा तवा पुलाव कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत.

साहित्य

१ वाटी बासमती तांदूळ
२ वाट्या पाणी
चार मिरे, चार लवंगा, एक तमालपत्र
२ चमचे पावभाजी मसाला
३ चमचे बटर
अर्धा चमचा लाल तिखट
१ उभा चिरलेला कांदा
१ उकडलेला बटाटा
१ बारीक चिरलेला टोमॅटो
उभी चिरलेली सिमला मिरची दोन
गाजराचे छोटे व उभे तुकडे
उकडलेला मटार
१ चमचा आलं, लसूण पेस्ट
मीठ
तेल किंवा तूप
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती


सर्वप्रथम कुकरमध्ये २ वाट्या पाणी उकळत ठेवा. यानंतर त्यामध्ये १ चमचा बटर, मिरे, तमालपत्र, लवंग घाला.पाणी उकळल्यानंतर त्यात धुवून निथळलेले १ वाटी तांदूळ घाला आणि मीठ घालून कुकरला दोन शिट्ट्या होऊ द्या. यानंतर गॅस बंद करा आणि लगेचच २ मिनिटांनी शिजवलेला भात एका परातीमध्ये काढून पसरून ठेवा.यानंतर एका मोठ्या पसरट तव्यावर किंवा कढईत २ चमचे तूप किंवा बटर घ्या. त्यात आलं, लसूण पेस्ट आणि कांदा परतून घ्या. आता त्यात उर्वरित सर्व भाज्या परतवून घ्या.भाज्या अर्धवट शिजवल्यानंतर त्यात २ चमचे पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून सर्व भाज्या हलवून घ्या.यानंतर त्यामध्ये थंड झालेला भात घाला आणि अलगद परतून घ्या. यानंतर एक वाफ आणून पुलाववर बारीक कोथिंबीर घाला आणि तयार झालेला चटपटीत तवा पुलाव सर्व्ह करा.

Related Stories

दिवाळी विशेष : खुसखुशीत आणि लेअर्स वाली शंकरपाळी

Kalyani Amanagi

कुरकुरी दही

Omkar B

चटपटीत रिंग

Omkar B

कोकोनेट मोहन पॅक

Amit Kulkarni

या थंडीत खावा गरम-गरम मुळा पराठा, जाणून घ्या रेसीपी

Archana Banage

खिचडी खाऊन कंटाळा आलाय; मग श्रावणात ट्राय करा उपवासाचे डोसे

Kalyani Amanagi