दिवाळीच्या फराळातील सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चटकदार चकली.कुरकुरीत चकली सर्वानाच आवडते. पण बऱ्याच वेळेला चकली मऊ पडते.शिवाय भाजणीला देखील वेळ लागतो.अशावेळी बिना भाजणीची, झटपट होणारी आणि खुसखुशीत चकली करायची असेल तर त्याला रवा चकली हा उत्तम पर्याय आहे.चला तर मग जाणून घेऊयात ही रेसिपी
कृती
१ कप पाणी
१/२ कप बारीक रवा
३ चमचे बटर
अर्धा कप तांदळाचे पीठ
अर्धा चमचा ओवा
१ चमचा तिखट
१ चमचे पांढरे तीळ
चिमूटभर हिंग
हळद
चवीनुसार मीठ
तेल
साहित्य
सर्वप्रथम एका कढईमधे १ कप पाणी उकळण्यास ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात अर्धा कप बारीक रवा घाला आणि पटकन चमच्याने मिक्स करून घ्या. यानंतर त्यामध्ये ३ चमचे बटर घालावे. मंद आचेवर २ ते ३ मिनिटं रवा शिजवून घ्यावा. यानंतर शिजवलेला रवा एका परातीमध्ये घ्या.आणि त्यामध्ये अर्धा कप तांदळाचे पीठ,ओवा,लाल तिखट,तीळ ,चिमूटभर हिंग,हळद आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य घाला. सर्व मिश्रण एकजीव करून पीठ मळून घ्या.पीठ मळताना शक्यतो पाणी वापरू नये. यांनतर चकलीच्या साच्यात पीठ घालून सर्व चकल्या गाळून घ्या.आणि मध्यम ते मंद आचेवर तळून घ्या.खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही रवा चकली तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा.
Previous Articleवेंगुर्ले बाजारपेठ विविध प्रकारच्या कंदिलांनी सजली
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.