वृत्तसंस्था/ मेलबोर्न
वेगवान गोलंदाज केगिसो रबाडा आणि ऍन्रीच नॉर्त्जे हे सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला विजेतेपद मिळवून देतील असे भाकीत दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टीनने केले आहे.
सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेत विविध देशांच्या वेगवान गोलंदाजांच्या होत असलेल्या कामगिरीचा आढावा घेतल्यास दक्षिण आफ्रिका संघातील रबाडा आणि नॉर्त्जे यांचा पहिल्याच पाच गोलंदाजांमध्ये निश्चितच समावेश असल्याचे जाणवते, असेही तो म्हणाला. 2014 साली न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातील अंतिम षटकात जेतेपदासाठी सात धावांची न्यूझीलंडला गरज असताना स्टीनने या षटकात भेदक गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर स्टीन सध्या क्रिकेट समालोचन करीत आहे.