Tarun Bharat

राधानगरीचा ४ था दरवाजा बंद, अजूनही दोन दरवाजे उघडे

राधानगरी प्रतिनिधी

जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने राधानगरी तलावाच्या पाणी पातळीत वाढ होऊन काल धरणाचा ४ था दरवाजा उघडला होता. ३ऱ्या आणिल ४थ्या दरवाजातून एकूण ७ हजार ३०० क्यसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता. त्यामुळे प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता.

पण पाण्याचा विसर्गामुळे आता ४ था दरवाजा पहाटे ४ वाजून १९ मिनिटांनी बंद झाल्याची बातमी येत आहे. आज ११ तारखेला धरणाचा ४ था स्वयंचलित दरवाचा पाण्याच्या ७ हजार ३०० क्युसेकने विसर्ग सुरु झाल्याने बंद झाला. अजूनही राधानगरी धरणाचे ५ आणि ६ नंबरचे दरवाज्यातून विसर्ग सुरू असून ४ हजार ४०० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्यापैकी २८५६ क्यसेक विसर्ग दोन्ही दरवाजातून होत आहे तर १६०० क्युसेकचा विसर्ग पॉवरहाऊस मधून होत आहे.

Related Stories

पन्हाळा : बंद बंगल्याचे कुलूप तोडून पावणे चार लाख रूपये लंपास

Archana Banage

भुविकासचे कर्मचारी, शेतकऱ्यांची दिवाळी

Archana Banage

महाव्दार रोडच्या रेशीम गाठी आणखी झाल्या घट्ट

Archana Banage

परिवहन मंत्र्यांची आरटीओ कार्यालयाला अचानक भेट

Abhijeet Khandekar

कोडोलीचे तीन भागात विभाजन : बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी

Archana Banage

मलकापूर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

Archana Banage