कसबा तारळे प्रतिनिधी
राशिवडे- राधानगरी मार्गावर राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे गावाजवळ मोटरसायकल व चारचाकी गाडीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातमध्ये मोटरसायकल वरील तरुण गंभीर जखमी झाल्याचे समजते. जखमी तरुणाला तातडीने रुग्णलयात हालवले आहे. ही धडक इतकी भीषण होती की यात मोटरसायकल अक्षरशः चक्काचुर झाली आहे.