Winter Special Recipes : थंडी सुरु झाली की गरमा गरम पदार्थ सतत खावे वाटतात. अशावेळी सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळच्यावेळी पराठा खाऊ शकता. मेथी, बटाटा, पालक, गाजर असे अनेक प्रकारचे पराठे तुम्ही ट्राय केले असतील आज तुम्हाला मुळा पराठा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. जो खायलाही चांगला आणि पोष्ठिक आहे. चला तर जाणून घेऊया रेसीपी.
साहित्य
किसलेला मुळा- 4 वाटी
गव्हाचं पीठ-4 वाटी
कांदे-3
मिरच्या-7 ते 8
कोथंबिर-
गरम मसाला- 1 चमचा
आमचूर पावडर- 1 चमचा
मीठ-चवीनुसार
कृती
सुरुवातीला एका बाऊलमध्ये गव्हाच पीठ, किसलेला मुळा, चिरलेला कांदा, मिरच्या, कोथंबिर,गरम मसाला,आमचूर पावडर आणि मीठ घाला. आता थोड-थोड पाणी घालून पीठ मळून घ्या.आता तेल थोडं घालून पीठ मळून घ्या. आता गोळा करून पराठा लाठून घ्या. तव्यात थोड तुप घालून पराठा खरपूस भाजून घ्या. गरम- गरम दही सोबत सर्व्ह करा. चिंवा चटणीसोबत देखील खावू शकता.

